Author: अनंत पांगारकर

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 17 जागांसाठी 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांचा एकमेव अर्ज असल्याने सत्ताधारी गटाकडून त्यांनी पहिली विजय सलामी दिली असून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी नंतर 16 जागांसाठी 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्यापासून (19 मे) 2 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, दोन पॅनलमध्ये सरळ लढत होते की सत्ताधारी गटाविरोधात काही अपक्ष निवडणूक मैदानात उतरतात…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सर्व सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या आणि राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी (ता. 17 मे 2023) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षाचे होते. गुरुवारी अहमदनगरच्या अमरधाम मध्ये सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यंदाच्या 1 जून 2023 रोजी पहिल्या एसटीच्या कारकिर्दीच्या प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा चालता-बोलता साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक नव्हते. खासगी बस…

Read More

मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते. संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी…

Read More

सह्याद्रीच्या डोंगररांगात मे महिन्यात आंबा, जांभळाच्या सिझन बरोबरच “करवंद” या फळाचा सिझन चालू होतो. करवंदाचे झाड झुडुपासारखे पसरलेले असते. त्याला काटे असतात. डोंगरावर ते नैसर्गिकपणे आलेले असतात. डोंगरावर यांच्या जाळी पसरलेल्या असतात. दाट व घट्ट जाळीत शिरता येत नाही. उन्हाळ्यात डोंगर रांगेतील घाटात त्या भागातील नागरिक झाडांचे पानाची टोपली करून त्यात “करवंदे” ठेवून विकायला बसतात. हे बघून आपण थांबतोच व करवंदे घेतो. माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात व भाऊ बाळासाहेब थोरात आम्हाला मे महिन्याच्या सुट्टीला आलेल्या सर्व मुलांना घेऊन माळशेज घाटात व इतर डोंगरावर करवंद खायला नेत. व करवदांच्या जाळ्यांमध्ये जाऊन आम्ही मोठे मोठे पिकलेले करवंदे खायचो. त्याचा आनंद आम्ही…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सहकारी महिलेचे आक्षेपार्ह फोटो कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकणाऱ्या त्या कृषी पर्यवेक्षकाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी तात्काळ निलंबन केले आहे. पर्यवेक्षकाच्या निलंबनाच्या आदेश संगमनेर कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. संगमनेरच्या कृषी विभागाला पुरते बदनाम केलेल्या आणि त्याला अनेकदा पाठीशी घातलेल्या या रंगेल कर्मचाऱ्याच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले होते. व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकले गेल्यानंतर जागा झालेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी संगमनेर कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक असलेल्या…

Read More

अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 30 मे 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्‍ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुक, मतदान, मतमोजणी व जयंती साजरी होणार आहेत. तसेच सभा, महासभा, आंदोलने इत्‍यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी यांनी 17 मे 30 मे 2023 रोजीच्‍या रात्रीचे 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकान्‍वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरच्या कृषी विभागातील एका कर्मचाऱ्याच्या रंगेल लीला मंगळवारपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. कृषी पर्यवेक्षक असलेल्या या कर्मचाऱ्यांने आपल्याच खात्यातील एका महिलेचे अश्लील फोटो कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर सेंड केले आणि या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या लीलांना तोंड फुटले आहे. कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या कर्मचाऱ्यावर आता कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. नवीन नगर रोडच्या प्रशासकीय इमारतीमध्ये थेट वरच्या मजल्यावर कमी वर्दळीच्या ठिकाणी संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय आहे. थेट वरच्या मजल्यावर असल्याने या कार्यालयाशी फारसा कोणाचा संपर्क येत नाही. याच कार्यालयात गेल्या काही वर्षापासून एक कर्मचारी ठाण मांडून बसला आहे. कर्मचाऱ्यांचे आपल्याच विभागातील महिलेसोबत गेल्या अनेक…

Read More

शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील १५ मंडळामध्ये आज बुधवार १७ मे २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरांस सुरुवात करण्यात आली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली आले आहेत. शिबिरात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येऊन जागेवरच त्यांच्या कामाबाबतची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती संगमनेरचे नवे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १७ मे रोजी संगमनेर, धांदरफळ शिबलापूर (आश्वी खुर्द), घारगाव व साकुर या मंडळात शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या नियोजनासाठी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्ह्यात बाजी मारली आहे. शाळेने यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखतांना दहावीच्या जय नीलेश वाकचौरे व श्रेयान अनिकेत कासार यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवतांना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ध्रुवच्याच संस्कृती दत्तू शेळके (97.80 टक्के) व श्रीशा विराज शिंदे (97.40 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवतांना ध्रुव ग्लोबलच्या यशाची पताका फडफडती ठेवली आहे. याशिवाय श्रीरंग गिरीश नाझीरकर, अद्वैत विवेक तळणीकर, तनया विक्रम गाडे, अनय सचिन नवले, अमनदीप नीतिन आरोटे, गायत्री विजय घुले, पृथ्वीराज प्रशांत देशमुख, जय विलास बेनके, साईतेज…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय क्रीडा नृत्य स्पर्धेत गीता परिवार संचलीत संस्कार बालभवनच्या मुलांनी देदीप्यमान यश मिळवले. स्पर्धेच्या प्रारंभापासून वर्चस्व प्रस्थापित करतांना बालभवनाच्या नृत्य कलाकांरानी 39 सुवर्णपदकांसह एकूण 50 पदकांची लयलुट केली. वैयक्तीक व सांघीक अशा दोन्ही प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवणार्‍या बालभवनला या राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद देण्यात आले. या स्पर्धेत बालभवनचे 25 नृत्य कलाकार सहभागी झाले होते. 13 वर्षांखालील मुलींच्या वैयक्तीक शास्त्रीय नृत्यप्रकारात रीत चेतन राजपाल, 17 वर्षांखालील गटातील अदिती राजेश लाहोटी यांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर पहिल्या क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले. 21 वर्षांखालील गटात जीया अमित बाफनाने रौप्यपदक व रिया गोपाल साकीने कांस्यपदकाची कमाई केली. 17…

Read More