Author: अनंत पांगारकर

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा १० लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरमध्ये ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संगमनेर भागात गस्तीवर होते. दरम्यान, बोटा शिवारातील कुरकुंडी फाटा येथे एक अशोक लेलँड कंपनीचा डंपर संशयास्पद…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाया केल्या. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून, कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशीय जनावरांची निर्दयतेच्या विळख्यातून सुटका केली आहे. मदिनानगरमध्ये पहाटेची कारवाई-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक संगमनेर शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना, त्यांना मदिनानगर येथील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज दारूचे व्यसन हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक गंभीर मानसिक व शारीरिक आजार आहे, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशननेही मान्य केले आहे. या आजारातून सावरण्यासाठी आणि मद्यपींना सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्यासाठी ‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ (ए.ए.) ही जागतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. याच कार्याचा भाग म्हणून संगमनेर शहरात एका विशेष ‘जनजागरण सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरमधील नागरिकांसाठी ही सभा उद्या शनिवारी, (दिनांक २७ डिसेंबर) दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये संगमनेरच्या भंडारी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोणासाठी आहे ही सभा?- ज्या व्यक्तींना स्वतःची दारू सोडण्याची मनापासून इच्छा आहे, किंवा ज्यांच्या घरात…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी): मालपाणी फाऊंडेशन संचलित ध्रुव ग्लोबल स्कूलने आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा जपत यावर्षी मेवाडच्या गौरवशाली इतिहासावर आधारित भव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता मालपाणी लॉन्स येथे हा प्रेरणादायी सोहळा पार पडणार असून, यामध्ये शाळेच्या माध्यमिक विभागातील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून परकीय आक्रमकांना तब्बल तीन शतके रोखून धरणारे बाप्पा रावल यांच्यापासून ते अटकेपार झेंडा फडकवणारे महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रेक्षकांना यावेळी राणी पद्मिनीचा ऐतिहासिक जोहर, वीर गोरा आणि बादल यांचे अचाट शौर्य, पन्नादाईंचा सर्वोच्च त्याग आणि दानशूर भामाशाह यांच्या दातृत्वाची गाथा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहराचा नावलौकिक आणि वैभव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर ब्र काढायला तयार नसलेले महायुतीचे पदाधिकारी आता निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सक्रिय झाले आहेत.  नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी अद्याप आपल्या पदाचा कार्यभारही हाती घेतलेला नसताना मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेणे, ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड यांनी केली आहे. दिलीपराव पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महायुतीच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे. ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संगमनेरने विकासाची…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र…

Read More

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आज पूर्णत्वास जातील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रकल्पांची आखणी करण्यासाठी हा उत्तम काळ असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर विश्रांती घ्या.…

Read More

श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपीने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रॅक्टरवर झडप घालून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका टेम्पो चोरीचा (MH 14 AH 369) गुन्हा दाखल असून हा टेम्पो संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमालपूर) याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कर्मचारी अजित पठारे व प्रसाद साळवे यांनी…

Read More

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करण्यासह सुरक्षिततेच्या विविध प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- मंत्रालयातील दालनात झालेल्या या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दूध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे महिला आणि शेतकऱ्यांचा चारा काढण्यासाठी शेतात सातत्याने वावर असतो,…

Read More