Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या पोलीस वसाहतीतील हेड कॉन्स्टेबलसह एकाला १२ हजाराची लाच घेताना श्रीरामपूरमध्ये पकडले
गुन्हेगारी

संगमनेरच्या पोलीस वसाहतीतील हेड कॉन्स्टेबलसह एकाला १२ हजाराची लाच घेताना श्रीरामपूरमध्ये पकडले

लाचखोरी थांबेना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/06/2024Updated:02/06/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. २ जून

श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाचे नाव न येण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी करत १२ हजार रुपयाची लाच घेतांना श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॅान्स्टेबल रघुनाथ खेडकर व खासगी इसम राजू शामकुमार श्रीवास्तव एसीबीच्या जाळ्यात अडकले.

याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ आश्रुबा खेडकर (वय-५५ वर्षे, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर) व खासगी इसम राजू शामकुमार श्रीवास्तव (वय-४६ वर्षे, धंदा- चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड, भैय्या गल्ली, श्रीरामपूर ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एचजीव्ही टिप्पर मालकीचा होता. सदर टिप्पर त्यांच्या भावानी दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी वाहन खरेदी पावती करून त्यांचे नातेवाईकास विकून ताब्यात दिला होता. सदर टिप्पर दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अवैध मुरूम वाहतूक करताना श्रीरामपूर तहसील कार्यालयाने पकडला होता. सदरचा टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी झाला. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १४४ नुसार भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांच्याकडे होता. तपासामध्ये तक्रारदार यांचेकडुन टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक व त्यांच्या चालकानेच टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने तक्रारदाराचे नातेवाईक व टिप्पर चालकाला पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर यांनी सीआरपीसी ४१(१)(अ) प्रमाणे नोटिस दिली होती. सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने खेडकर यांनी दि. ३१ मे रोजी तक्रारदाराची भेट घेऊन तक्रारदाराच्या भावाकरिता सीआरपीसी ९१ प्रमाणे नोटीस दिली व सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाचे नाव न येण्याकरिता चाळीस हजार रुपयांची मागणी करत तक्रारदार व त्यांचे टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक यांना शनिवारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बोलावले होते.

अशी तक्रार अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे शनिवारी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान हेड कॉन्स्टेबल खेडकर यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती १२ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी खेडकर याने दाखविल्यानंतर पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार किशोर लाड, बाबासाहेब कराड, गजानन गायकवाड, दशरथ लाड यांनी सापळा लावला.

लाचेची रक्कम खेडकर याने खासगी इसम श्रीवास्तव याच्याकडे देण्यास सांगितली. खेडकर याच्या सांगण्यावरून श्रीवास्तव याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला पकडण्यात आले. तसेच लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खेडकर यालादेखील ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,280
प्रवीण लोखंडे लाचखोरी श्रीरामपूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.