Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात तीन गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे, घरगुती गॅस वापराच्या टाक्यांसह सुमारे पंधरा लाखाचे साहित्य जप्त
गुन्हेगारी

संगमनेरात तीन गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे, घरगुती गॅस वापराच्या टाक्यांसह सुमारे पंधरा लाखाचे साहित्य जप्त

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2024Updated:10/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १० ऑगस्ट 

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी तीन गॅस रिपेरिंग सेंटरवर छापे टाकले. या दोन्ही ठिकाणाहून भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन गॅसच्या घरगुती वापराच्या टाक्यांसह, एक मारुती ओमनी कार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शहरातील अलकानगर परिसरात हावडा ब्रिजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये व जोर्वे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत मोहसीन रफिक शेख, वय ३५ वर्ष, इम्रान रऊफ शेख वय ३८ वर्ष, व इम्तियाज रफिक शेख (तिघे रा. अलकानगर, संगमनेर) या तिघांवर तर दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील शेख वय ३४ वर्ष, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), तिसऱ्या कारवाईत ओंकार राजेंद्र पानसरे (घुलेवाडी, संगमनेर), संपत चिमाजी वाळुंज (गणेशविहार, संगमनेर), जनाराम सुरेश लांडगे (कासारवाडी संगमनेर) व अविनाश राधाकिसन माळी (धुमाळवाडी, अकोले) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन गॅस कंपनीच्या घरगुती वापरांच्या गॅस टाक्याचे रिफिलिंग करून, साठा करण्याची परवानगी नसताना विनापरवाना साठा करून जीवनावश्यक पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा धोकादायक पद्धतीने ठेवत विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ सह एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० कलम ३ व ७ प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३, २८७, १२५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पहिल्या कारवाईत ६८,९००/-रुपयांचा तर दुसऱ्या कारवाईत ३८,९०० रुपयांचा मुद्देमाल, तर तिसऱ्या कारवाईत १४,३१,५१० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे. सर्वात मोठ्या ठरलेल्या तिसऱ्या कारवाईत संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गवळी, महिला पोलीस नाईक लता जाधव, पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, अपर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोबळे, सहाय्यक फौजदार कणसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हिंदी, काका मोरे, पठाण यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश जगधने, हेड कॉन्स्टेबल राजू झोले यांचा समावेश होता.

यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल आत्माराम दत्तात्रय पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव, पोलीस हेडकन्स्टेबल अनिल गवळी यांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून आठ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भांन्सी हे करत आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,240
कारवाई गॅस रिफिलिंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; २० लाखांचा वाळू तस्करांचा मुद्देमाल जप्त

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.