गुरुवार, दि. ०५ सप्टेंबर
संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात संगमनेर प्रखंडाची विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेच्या शहराध्यक्षपदी श्रीकांत मोरे, शहर उपाध्यक्षपदी शेखर वामन, कार्याध्यक्षपदी ओम बिल्लाडे, प्रखंड मंत्रीपदी कृष्णा डंबिर, सहमंत्रीपदी वैभव मेहेत्रे, कोषाध्यक्षपदी प्रसाद थोरात, शहर संयोजकपदी ओंकार भालेराव, संयोजकपदी रवी मंडलिक व किरण पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय बजरंग दल बलोपासना प्रमुख म्हणून आदित्य गुप्ता, सहप्रमुख प्रणव सस्कर, बजरंग दल महाविद्यालयीन प्रमुख सुमित वर्मा, सहप्रमुख समर्थ कटारे, गौरव वराडे, साई ठाकूर, ओंकार डावखरे, श्लोक मुळे, गोरक्षा प्रमुखपदी आदित्य रुपवते व ओम सातपुते, मातृशक्ती संयोजिका म्हणून संगीता बैरागी, दुर्गावाहिनी संयोजिका ॲड. सोनाली बोटवे यांचा समावेश आहे.
प्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून आनंद मिसाळ, सत्संग प्रमुख म्हणून रोहित मोहरीकर, सेवा प्रमुख म्हणून आकाश बनकर, मंदिर आणि अर्चक प्रमुख विशाल जाखडी, विशेष संपर्कप्रमुख म्हणून प्रतीक डोखे, धर्म प्रसार प्रमुख म्हणून सागर पाटील, धर्मप्रसार सहप्रमुख म्हणून साई गुप्ता आदींचा समावेश आहे.