शनिवार, २८ सप्टेंबर
भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे बंधू असून ते राजकारणात सक्रिय होते. चंदेल रात्री साडेआठ वाजता आपल्या राईस मिल मधून पायी निघून मोबाईलवर बोलत बोलत ते जात असल्याचे सांगितले जाते.
शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि न्यायला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चंदेल यांनी घातलेल्या शर्टावरून त्यांची ओळख पटविण्यात यश आले.
चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी देखील आत्महत्या की हत्या या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.