सोमवार, ३० सप्टेंबर
दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सहाय्यक, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका निशा सिंग यांना २०१५ च्या एका खटल्यात दोषी ठरविण्यात आले असून हिंसा भडकवल्याबद्दल त्यांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाविरुद्ध हिंसक जमाव भडकविल्याबद्दल आणि त्यानंतर जमावाने गुडगावमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकले होते. २०१५ च्या या खटल्यात निशा सिंग यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मोना सिंग यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले.
मोना सिंग यांच्या न्यायालयाने या खटल्यात निशा सिंग यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दहा महिलांसह सतरा जणांना दोषी ठरविले. या खटल्यात दहा रुपयांना सात वर्ष सक्त मजुरी व दंड तर उर्वरित आरोपींना दहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
न्यायालयाने म्हटले की, “आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांना दुखापत करणे ही एक गंभीर चूक आहे यात शंका नाही, परंतु त्यांची सुधारणा किंवा पुनर्वसन होऊ शकत नाही आणि ते हिंसाचाराचा अवलंब करणार नाहीत यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. न्यायालयाने सर्व दहा महिलांना दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे, तर इतर सात दोषींना प्रत्येकी वीस हजार रुपये दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास शिक्षा दोन ते तीन वर्षांनी वाढवली जाईल. १७ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम १४८, १४९, १८६, ३२५, ३३२, ३३३, ३५३, ४३६, ४२७ आणि ४३५ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.
निशा सिंग या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय आहेत. त्यांनी यापूर्वी त्यांची सल्लागार म्हणूनही काम केले आहे.