सोमवार, ३० सप्टेंबर
राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना ऑगस्टअखेरचे २ कोटी ५५ लाख ५५ हजार ८०० रुपये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थी खात्यात आज वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५७२५ लाभार्थ्याना ८४ लाख ३८ हजार १०० रुपये, अनुसूचित जातीच्या ६२७ लाभार्थ्याना ९ लाख ३२ हजार ७०० रुपये, अनुसूचित जमातीच्या २५५ लाभार्थ्यांना ३ लाख ७९ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्वसाधारण ५२६१ लाभार्थ्यांना ७८ लाख ९१ हजार ५०० रुपये.
श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या ६८१ लाभार्थ्यांना १० लाख २१ हजार ५०० रुपये, माहे जून, जुलै व ऑगस्टचे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२४ लाभार्थ्यांना १४ लाख १० हजार रुपये, माहे ऑगस्टचे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ४२४२ लाभार्थ्यांना ५४ लाख ८२ हजार ५०० रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आले आहे.
संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक या आठवड्यात घेण्यात येणार असून कागदपत्रे परिपूर्ण असणाऱ्यांनी तात्काळ जमा करावी. तसेच मुख्यमंत्री- लाडकी बहिण योजनेचे ज्यांना पैसे भेटले आहे अश्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरू नये. – अमोल खताळ पाटील, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तथा संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख.