रविवार, १० नोव्हेंबर
संगमनेर – संगमनेरलगत असलेल्या एका गावामध्ये तीस वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलीस ठाण्यात पीडीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
बलात्काराची ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली असून या संदर्भात पीडित महिलेच्या सासूने ८ नोव्हेंबरला दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी नामदेव मच्छिंद्र चव्हाण (रा. महादेव वस्ती, सुकेवाडी, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला शौचासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतामध्ये गेली असताना तेथे आलेल्या नामदेव चव्हाण यांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकेल, अशी धमकी देखील त्याने या महिलेला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दिवाळीत महिलेच्या सासूने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी नामदेव मच्छिंद्र चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २३४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(ग), ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस पुढील तपास करत आहे.