रविवार, १० नोव्हेंबर
संगमनेर – प्रतिनिधी
निंबाळे येथील घटने संदर्भात पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची घटनाही वाहनांचा कट लागल्याच्या कारणावरून घडली आहे. सद्यस्थितीत शांतता असून कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, तसेच कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा घटनेबाबत कोणती अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले आहे.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्वनाथ सुखदेव शिंदे (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे एम.एच. १७ ए.ए. ८८५ या वाहनातून त्यांच्या मुलीस संगमनेर बस स्टैंडवर सोडण्यात जात असताना मोटार सायकलस्वाराने त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकार बनव वेगात दुष्काळली पणे चालवून कट मारला होता.
सदर मोटरसायकल स्वराज कट का मारला असे विचारले असता मोटार सायकलस्वार आयान आसिफ बेग (रा. निंबाळे, संगमनेर) याने विश्वनाथ शिंदे व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करून मारहाण करून तिथून पळून गेला होता. या घटनेमुळे निंबाळे चौफुली येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी फौज फाट्यासह परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. तसेच संबंधित तरुणास ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली. दरम्यान सदर घटने संदर्भात विश्वनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९४०/२४ अन्वये बी.एन.एस. कलम २८१, ११५, ३५२ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच आयान असिफ बेग याने दिलेल्या फिर्यादीवरून बी.एन.एस. कलम ११५, ३५२(२), ३५२ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.