संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १ हजार २४२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण
मंगळवार, १२ नोव्हेंबर
संगमनेर – मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.
वसंत लॉन्स येथे संगमनेर विधानसभा मतदार संघातील १ हजार २४२ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज मांजरे उपस्थित होते.
हिंगे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला असणे गरजेचे आहे.
यावेळी मतदान यंत्राची जोडणी, मतदान यंत्र हाताळणी, घोषणापत्र व फॉर्म अचूक भरणे, मतदान प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच प्रत्यक्ष मतदान यंत्रांची हाताळणीचे यांत्रिक प्रशिक्षण घेण्यात आले.