Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो?”, अशा शैलीत लोकसभेवेळी अजित पवारांनी आव्हान दिलेल्या त्या आमदाराचं निवडणुकीत काय झालं?
निवडणूक

“अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो?”, अशा शैलीत लोकसभेवेळी अजित पवारांनी आव्हान दिलेल्या त्या आमदाराचं निवडणुकीत काय झालं?

काय घडलं बघा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, २३ नोव्हेंबर

लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती रंगल्या होत्या. बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना करावा लागला.

राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्यापरीने कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? या मागची कारण शोधत त्यावर विश्लेषण करत आहे.

मात्र अशाच एका लढतीची उत्सुकता अजित पवार यांच्या विधानामुळे राज्याला लागली होती. ती लढत शिरूर मतदार संघात बघावयास मिळाली. या मतदारसंघातील आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर आव्हान दिलं होतं. त्यामुळे शिरूर मतदारसंघात ‘त्या’ आमदाराचं काय झालं? विधानसभेचा निकाल काय लागला हे बघूयात.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ९ मे २०२४ रोजी अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. “अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”, अशा आपल्या शैलीत आव्हान दिलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी आव्हान दिलेले अशोक पवार जिंकले की पराभूत झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शनिवारी (२३) रात्री या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शिरूरमध्ये अशोक पवार पराभूत झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा ७४,५५० मतांनी पराभव केला आहे. कटके यांना १,९२,२८१ मतं मिळाली, तर अशोक पवारांना १,१७,७३१ मतं मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेला आव्हान खरं करून दाखवील असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,009
अजित पवार अशोक पवार शिरूर विधानसभा मतदारसंघ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.