Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

18/10/2026

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीची सत्ता आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या निकषांमध्ये केले मोठे बदल… निकषात न बसणाऱ्या बहिणी मदतीपासून राहणार वंचित
राजकारण

महायुतीची सत्ता आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या निकषांमध्ये केले मोठे बदल… निकषात न बसणाऱ्या बहिणी मदतीपासून राहणार वंचित

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/12/2024Updated:04/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, ०४ डिसेंबर – मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. विरोधकांनीही योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले होते. राज्यात महायुतीची सत्ता आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या गेम चेंजर ठरलेल्या या योजनेकडे आता वक्रदृष्टी झाली आहे. सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावे लागू शकते. सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू होताच, प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन कोटी महिला लाभार्थी – राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. निवडणुकीआधी ज्या-ज्या महिलांनी अर्ज केला, त्या सर्वांना प्रति महिना १,५०० रुपयांचा लाभ दिला गेला. तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास २,१०० रुपयांचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

आता गरजवंत महिलांनाच लाभ – मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत, यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबविली जाणार आहे.

तर योजनेतून बाद – या संदर्भात लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

अशी होणार पडताळणीची प्रक्रिया…

अ) कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन – पहिल्या टप्प्यात उत्पन्न, ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.

ब) प्रत्यक्ष तपासणी – अर्जदाराने दिलेली माहितीची खातरजमा करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देणार आहेत. यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल.

क) कागदपत्रांची पुनर्तपासणी – अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्र सादर केले आहेत, त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहेत. मतदार याद्या, प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येईल.

ड) तक्रारी – जर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कुणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल. यासाठी हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल आणि फिल्ड एजंट उपलब्ध करून दिले जातील.

इ) स्थानिक नेत्यांचा सहभाग – या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना सामावून घेतले जाईल.

लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी आता करावी लागणार पूर्तता… 

१) उत्पन्नाचा दाखला – अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल.

२) प्राप्तीकर प्रमाणपत्र – अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल.

३) निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी – ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते, त्यांची वेगळी छाननी केली जाईल.

४) जमिनीची मालकी – ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत

५) प्रति कुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश – कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला येणार नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,366
महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर व संगमनेरात एलसीबीची धडक कारवाई; अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका!

By Annant Ppangarkar18/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर (तोफखाना) आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.