लेखक तांदळे यांनी रामाच्या काळात लिहिली ‘रावण राजा राक्षसांचा’ कादंबरी, मेधा महोत्सवाचे आनंद पर्व आज सुरू – माजी मंत्री थोरात
काश्मीरपासून केरळपर्यंतचे विद्यार्थी येथे येत असे. भाषेची अडचण असताना देखील ते येथे शिकले. हे विद्यार्थी जीवनात 'आम्ही यशस्वी कसे झालो' हे तुम्हाला सांगणार आहे


संगमनेर दि. २ फेब्रुवारी –
संगमनेर मध्ये रविवारी अमृतवाहिनी कॉलेजच्या प्रांगणात बहुचर्चित ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते.
मेधा महोत्सवाचे पहिले पुष्प प्रख्यात लेखक, मेकॅनिकल इंजिनियर असलेले उद्योजक शरद तांदळे यांनी गुंफले. यावेळी थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधा समन्वयक डॉ. व्यंकटेश आदींसह मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, २०१६ मध्ये सुरू झालेला मेधा महोत्सव सर्वांसाठी वर्षातील एक आनंद पर्वणी ठरत असतो. आज या आनंद पर्वाची सुरुवात होत असून या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये आपण या महोत्सवात राज्यातील पाच तरुण आमदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आजही त्या मुलाखती चर्चिल्या जातात. यावर्षी देखील असा उपक्रम करण्याचा प्रयत्न आहे.
स्नेहसंमेलना व्यतिरिक्त सर्व संस्थांच्या माध्यमातून मेधा महोत्सव घेण्याच्या उद्देशामागे भारतातील चांगलं बोलणारे वक्ते या व्यासपीठावर आणण्याचा मानस असतो. हे वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेधा महोत्सव अकराला आला.
आज या महोत्सवात मेकॅनिकल इंजिनिअर असलेले शरद तांदळे आज आपल्याकडे आले आहे. ते अतिशय चांगले लेखक आहे. उद्योजक, मुलांना ते मार्गदर्शन करतात. तांदळे यांनी रामाच्या काळात रावण लिहिला आहे. बळी या पुस्तकाचे लिखाण ते सध्या करत आहे. ते एक क्रांतिकारक पुस्तक असेल. मेधाच्या पहिल्या पुष्पाची सुरुवात ते आज करत आहे. त्यांचं मार्गदर्शन तुमच्या जीवनासाठी मार्गदर्शकच नव्हे तर उपयोगी ठरणार आहे.