Author: अनंत पांगारकर

संगमनेर: तहसील, प्रांत, दिवाणी व जिल्हा न्यायालय आणि अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजय मिळवूनही मंगळापूर येथील शेतकऱ्यांना अजूनही सामाईक रस्ता मिळालेला नाही. सक्षम प्राधिकरणांचा शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागूनही संगमनेर तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाचे आदेश मोठे की तहसीलदार, असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथील सर्व्हे नंबर ७८ मधील सामाईक रस्त्यावर काही व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून तो अडवला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मशागत, पिकांची व अवजारांची वाहतूक करणे अशक्य झाले आहे. याविरोधात आप्पा पवार, सिताराम पवार, सूर्यभान पवार, बाळकृष्ण पवार, रावसाहेब…

Read More

अहिल्यानगर | प्रतिनिधी: येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी ( ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल २७ हजार पारायण पार पडले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो.  केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. आज सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होवून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तीन टप्प्यांमध्ये…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, परंतु आरोग्याबाबत थोडी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला आणि अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांततेने काम करण्याचा आहे. व्यवसायात नवीन योजना आखताना घाईगडबड करू नका, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल आणि आर्थिक स्थिती स्थिर राहील. मिथुन – आज तुम्हाला विविध क्षेत्रांत यश मिळण्याचे योग आहेत. बुद्धिमत्ता आणि संवाद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य आणि त्याग दाखवला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आणि शांत झोपू शकतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी कारगिल युद्धात मिळवलेला विजय हा आपल्या इतिहासातील अत्यंत सुवर्ण आणि महत्त्वाचा अध्याय आहे. या पराक्रमाचे आणि हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण कायम राहावे, यासाठी संगमनेरमध्ये राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक उभारले जाईल. या स्मारकासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा देण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री…

Read More

प्रवीण पुरो दिल्लीच्या जंतरमंतरवर जमलेल्या देशातील युवा पिढीने नरेंद्र मोदींच्या सरकारची घमेंड पुरती मोडली आहे. “कुठल्याही परिस्थितीत राजीनामा नाही म्हणजे नाही,” असा सूर आवळून बसलेल्या मोदींना अखेर माघार घ्यावी लागली. ती त्यांची मजबुरी होती. ‘जेन झी’ला कस्पटासमान वागवणाऱ्या सरकारवर नामुष्की आली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात लाडके मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपद सोडावे लागले. प्रधान यांनी पद सोडले नसते तर देशभर हल्लाबोल झाला असता, याची जाणीव मोदी आणि अमित शहांना झाली हे बरे झाले. भक्तांच्या खोट्या पाठिंब्यावर या दोघांची मदार असते. भक्त काल आणि परवाही सत्तेची लाली टिपत होते. प्रधानांनी राजीनामा दिला तरीही भक्तांची जात ४० पैशांचे काम इतबाराने करत होती.…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही अतिशय उत्तमरीत्या पार पाडाल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रियजनांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. ​वृषभ – आज आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांना नवीन योजनेतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखून चालल्यास मनःशांती लाभेल. दिवसभरात एखादी गोड बातमी ऐकायला मिळू शकते. ​मिथुन – आज कला आणि निर्मितीक्षम कामांमध्ये तुमची आवड वाढेल. नोकरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. निरर्थक चिंतांपासून दूर राहून सकारात्मक विचारांवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला. दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा बनाव करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सतर्क नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या मागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संतवाडी शिवारात राहणाऱ्या भामाबाई सोनभाऊ निमसे यांचे घर बंद असल्याचे पाहून ३ महिला व १ पुरुष अशा चार जणांच्या टोळीने दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळची भांडी आणि पाण्याचा बंब त्यांनी आणलेल्या पोत्यात…

Read More

आजचे राशीभविष्य ​मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु व्यावसायिक क्षेत्रातील नवीन योजनांमुळे भविष्यात चांगला नफा मिळेल. कौटुंबिक वातावरणात आनंद राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. ​वृषभ – कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना पूर्ण काळजी घ्या. आर्थिक आवक स्थिर असली तरी विनाकारण खर्च करणे टाळा. ​मिथुन – आज सहजीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक खरेदी टाळून बजेटवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. ​कर्क – व्यावसायिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर पोलिसांच्या वतीने शनिवारी, (२५ जुलै) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तक्रारींसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या तक्रार निवारण दिनी श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत संगमनेर शहर पोलिस स्टेशन येथे होणार आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित…

Read More