Author: अनंत पांगारकर
संगमनेर (प्रतिनिधी): नवीन लोकप्रतिनिधीचा कट्टर समर्थक अशी बिरूदावली मिरवून, स्वतःची लायकी नसताना सातत्याने कोणावरही अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिनेश फटांगरे या विकृत माणसाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी संगमनेर तालुका काँग्रेससह तालुक्यातील तरुणांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने संगमनेर तालुक्यातून मोठी संतापाची लाट उठली असून, या प्रवृत्तीविरोधात आता नगरसेवकांसह नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत संगमनेर तालुक्यातील तरुणांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या देत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनेश फटांगरे या विकृत व विध्वंसक प्रवृत्तीने सातत्याने चांगल्या गोष्टींना विरोध केला आहे. सध्याचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा कट्टर समर्थक म्हणून वावरताना त्याने…
संगमनेर, प्रतिनिधी – येथील पंचायत समिती जवळ असलेल्या ‘किसान ऑटोमोबाईल्स’च्या नवीन स्पेअर पार्टसच्या गोडाऊनला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील नवीन मोटार पार्टस जळून खाक झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार शेख शोएब फरीद यांच्या मालकीचे हे किसान ऑटोमोबाईल्सचे गोडाऊन असून, अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. गोडाऊनमध्ये ऑईल आणि रबरी पार्टस असल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली होती. घटनेची माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यास तब्बल दीड तासाचा विलंब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचे अग्निशमन दल येण्यापूर्वी थोरात कारखान्याच्या फायर फायटरने…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकणारा शिवसेना शिंदे गटाचा माजी शहरप्रमुख दिनेश फटांगरे याच्यावर सलग दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग धरून त्याने ‘दैनिक युवावार्ता’चे संपादक किसन भाऊ हासे यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ‘पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत’ पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या फटांगरे विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिनेश फटांगरे केवळ संपादकांची बदनामी करून थांबला नाही, तर त्याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही गलिच्छ भाषेत टीका केली आहे. या विकृतीचा निषेध…
अकोले, प्रतिनिधी – शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’ वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेतमध्ये मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान लॉजिंगच्या…
संगमनेर: येथील रहिवासी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य भगवानराव जोशी सर यांच्या पत्नी मनिषा (वय ७५) यांचे गुरुवारी, (दिनांक २९ जानेवारी २०२६) सायंकाळी ५:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जोशी परिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांनी जोशी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पती प्राचार्य भगवानराव जोशी सर, पत्रकार गिरीश आणि श्रीहरी हे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनिषा जोशी या प्रेमळ आणि सुस्वभावी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी संगमनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस शुभ आहे. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे…
श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम हाती घेतली असून, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राहाता तालुक्यातील निमगाव एम.आय.डी.सी. परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ श्रीरामपूर यांनी या मोहिमेत हातभट्टीच्या गावठी दारूने भरलेले एक चारचाकी वाहन पकडले आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा क्रमांक MH.05.AJ.5794 असून, त्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू आढळून आली. याप्रकरणी आरोपी आकाश गोरख गायकवाड (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली गाडी आणि दारू असा एकूण १,३०,५०० रुपयांचा मुद्देमाल विभागाने ताब्यात घेतला आहे. सदरची यशस्वी कारवाई…
संगमनेर, प्रतिनिधी – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संगमनेरचे आक्रमक नेतृत्व आणि माजी शहरप्रमुख अमर कतारी यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या उत्तर भागासाठी अमित चव्हाण आणि दक्षिण भागासाठी फैसल सय्यद यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने संगमनेरमध्ये शिवसेनेची नवी आणि तरुण फळी सज्ज झाली आहे. कतारींच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी मजबूत होणार – अमर कतारी यांनी यापूर्वी शहरप्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांना पदोन्नती दिली आहे. तालुक्यात पक्षाची विखुरलेली ताकद एकवटून संघटना पुन्हा आक्रमकपणे उभी करण्याची मोठी जबाबदारी…
आजचे दैनिक राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असून गुंतवणुकीचे मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. मित्रांच्या भेटीमुळे संध्याकाळचा वेळ उत्साहात जाईल. मिथुन – आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी अतिउत्साह…
संगमनेर, प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखाला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) शहर प्रमुख दिनेश भीमाशंकर फटांगरे याची आमदार अमोल खताळ यांच्या आदेशावरून पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली असून, आता त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असतानाच, दुपारी दिनेश भीमाशंकर फटांगरे याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून “जसे ज्याचे…
