Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये शिवसेनेची (UBT) मोठी फेररचना: अमर कतारी उपजिल्हाप्रमुखपदी; शहरप्रमुखपदी अमित चव्हाण व फैसल सय्यद यांची वर्णी
राजकारण

संगमनेरमध्ये शिवसेनेची (UBT) मोठी फेररचना: अमर कतारी उपजिल्हाप्रमुखपदी; शहरप्रमुखपदी अमित चव्हाण व फैसल सय्यद यांची वर्णी

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संगमनेर परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होणार असून, ही नवीन कार्यकारिणी आता थेट जनसंपर्कावर भर देणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील संघटनात्मक निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संगमनेरचे आक्रमक नेतृत्व आणि माजी शहरप्रमुख अमर कतारी यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या उत्तर भागासाठी अमित चव्हाण आणि दक्षिण भागासाठी फैसल सय्यद यांची शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने संगमनेरमध्ये शिवसेनेची नवी आणि तरुण फळी सज्ज झाली आहे.
कतारींच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी मजबूत होणार – अमर कतारी यांनी यापूर्वी शहरप्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांना पदोन्नती दिली आहे. तालुक्यात पक्षाची विखुरलेली ताकद एकवटून संघटना पुन्हा आक्रमकपणे उभी करण्याची मोठी जबाबदारी आता कतारींवर असेल. या निवडीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले असून, सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे.
संगमनेर तालुक्यातील संपूर्ण नवीन कार्यकारिणी – संगमनेर तालुका आणि विधानसभा क्षेत्रासाठी पक्षाने नव्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील नावांचा समावेश आहे.
विधानसभा प्रमुख: योगेश खेमनर (संगमनेर विधानसभा)
तालुकाप्रमुख: भाऊसाहेब हासे (संगमनेर पश्चिम) आणि भीमाशंकर पावसे (संगमनेर पूर्व)
शहरप्रमुख: अमित चव्हाण (उत्तर शहर) आणि फैसल सय्यद (दक्षिण शहर)
उपजिल्हा संघटक: रंगनाथ फटांगरे (संगमनेर ग्रामीण)
तालुका संघटक: संजय फड
विधानसभा संघटक: दीपक साळुंखे
शहर संघटक: आसिफ तांबोळी
तालुका समन्वयक: अशोक सातपुते
शहर समन्वयक: बाळासाहेब घोडके
निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी शिवसैनिक सज्ज – शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, या नियुक्त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ज्या निष्ठावंतांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली नाही, त्यांना संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी आगामी संघर्षासाठी पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
अमर कतारी, अमित चव्हाण यांच्या निवडीमुळे संगमनेर परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होणार असून, ही नवीन कार्यकारिणी आता थेट जनसंपर्कावर भर देणार आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुक्यातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण नियुक्त्या:
संगमनेरसोबतच शेजारील कोपरगाव तालुक्यातही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत.
उपजिल्हाप्रमुख: रंगनाथ गव्हाणे (ग्रामीण) आणि अस्लम शेख (शहर).
तालुकाप्रमुख: भारत मोरे आणि श्रीरंग चांदगुडे.
शहरप्रमुख: बालाजी गोर्डे आणि गगनभय्या हाडा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,109
अमर कतारी अमित चव्हाण पदाधिकारी निवडी शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.