Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

29/11/2026

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
राजकारण

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या अमोल खताळ यांच्या कार्यपद्धतीचे आणि साडेतीन लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सुरू असलेल्या धडपडीचे विशेष कौतुक केले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ESIS) सेवा दवाखान्याचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. या दवाखान्यामुळे संगमनेर परिसरातील सुमारे १० हजार कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या विविध आरोग्यविषयक मागण्यांना आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी घुलेवाडी येथील नवीन रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा वाढीव निधी, तळेगाव दिघे येथे उपजिल्हा रुग्णालय, घुलेवाडी येथे महिला व नवजात बालकांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय आणि कर्करोग प्राथमिक तपासणी व उपचार केंद्र उभारण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालयाची गरज, बिबट्यांच्या हल्ल्यातील जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तातडीच्या उपचारांची व्यवस्था आणि आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. एस.आर. थोरात, नवले व मालपाणी यांसारख्या उद्योग समूहांसह हजारो कामगार कुटुंबांना नवीन ESIS दवाखान्याचा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या अमोल खताळ यांच्या कार्यपद्धतीचे आणि साडेतीन लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून सुरू असलेल्या धडपडीचे विशेष कौतुक केले. घुलेवाडी येथील नवीन इमारतीचे काम पूर्ण करून महिला व नवजात बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी पुढील टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देण्याचे नियोजन केले जाईल, तसेच ट्रॉमा केअर सेंटरसह इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत पात्र खासगी रुग्णालयांचा समावेश करण्याचे आवाहन करतानाच, योजनेत गैरप्रकार किंवा रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

यावेळी आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. प्रत्येक नागरिकाला वेळेवर, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मालपाणी उद्योग समूहाचे प्रतिनिधी, कामगार, महायुतीचे कार्यकर्ते, लाडक्या बहिणी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 104
१०० खाटांचे रुग्णालय ४० कोटी निधी ESIS दवाखाना अमोल खताळ कर्करोग तपासणी केंद्र कामगार आरोग्य सेवा घुलेवाडी रुग्णालय तळेगाव दिघे उपजिल्हा रुग्णालय प्रकाश आबिटकर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र आरोग्य विभाग संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

By Annant Ppangarkar29/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,…

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026

आजचे राशीभविष्य – २९ नोव्हेंबर २०२६

29/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.