Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण
राजकारण

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

‘आरोग्य संवाद यात्रे’निमित्त संगमनेर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी; आदर्श गाव हिवरे बाजार येथील आरोग्य शिबिरातही सहभागी होणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उद्या, रविवारी (दि. २९ नोव्हेंबर) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रे’अंतर्गत ते जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांची पाहणी करणार असून, संगमनेर येथे राज्य कामगार विमा योजनेंतर्गत नवनिर्मित डिस्पेंसरीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

राज्यात १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ही आरोग्य संवाद यात्रा राबवली जात आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीने होईल. यावेळी मंत्री आबिटकर रुग्णालयातील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि स्वच्छतेचा आढावा घेण्यासोबतच रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

यानंतर संगमनेर येथेच राज्य कामगार विमा योजनेच्या नवीन डिस्पेंसरीचे लोकार्पण होईल. या सुविधेमुळे परिसरातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सल्ला, तपासणी आणि उपचारांची मोठी सोय उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी आयोजित ‘जन आरोग्य संवाद’ कार्यक्रमातही ते नागरिकांशी संवाद साधतील.

दुपारच्या सत्रात आरोग्यमंत्री आदर्श गाव हिवरे बाजार येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन आयोजित आरोग्य शिबिरात सहभागी होणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेऊन ते लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) जिल्ह्यातील विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

नागरिकांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा अनुभव जाणून घेणे, यंत्रणेतील त्रुटी दूर करणे आणि लोकसहभागातून आरोग्य सेवा अधिक पारदर्शक व दर्जेदार करणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 81
अहिल्यानगर अहिल्यानगर बातम्या आरोग्य शिबिर आरोग्य संवाद यात्रा कामगार विमा डिस्पेंसरी प्रकाश आबिटकर महाराष्ट्र आरोग्य विभाग संगमनेर संगमनेर ग्रामीण रुग्णालय हिवरे बाजार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

By Annant Ppangarkar28/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य…

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

गरिबांचे कैवारी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणजे अजिजभाई

28/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.