Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026

आजचे राशीभविष्य – २९ नोव्हेंबर २०२६

29/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन
राजकारण

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, नाशिकचे विभागीय आयुक्त (नगरपालिका शाखा), अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांना पाठवण्यात आली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल भाऊ खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जाणीवपूर्वक निमंत्रण न देता तसेच कार्यक्रम पत्रिकेत त्यांचा नामोल्लेख न करता त्यांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात आणि नाट्यगृहातील नाटकांच्या तिकीट विक्रीच्या चौकशीसाठी मुख्याधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संगमनेरच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

संगमनेर नगरपालिकेच्यावतीने मोठ्या गाजावाजात कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र या सोहळ्यादरम्यान शासकीय नियमांची आणि परिपत्रकांची पायमल्ली झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रमाच्या उद्घाटन किंवा भूमिपूजनास स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांना आमंत्रित करणे तसेच कार्यक्रम पत्रिकेत पदानुसार त्यांचा नामोल्लेख करणे बंधनकारक आहे. असे असतानाही संगमनेरचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल भाऊ खताळ आणि खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना हेतुपुरस्सर निमंत्रित केले नाही आणि कार्यक्रम पत्रिकेतही त्यांची नावे टाकली नाहीत, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे संगमनेर शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाचा अनादर करणाऱ्या मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या नाटकांची तिकीट विक्री नगरपालिकेचे कर्मचारीच करत होते, अशी बाबही निवेदनात नमूद करत तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भविष्यात कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लोकप्रतिनिधींचा अपमान होणार नाही आणि शासन नियमांचे काटेकोर पालन होईल, यासाठी ही कारवाई होणे अपेक्षित असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या या निवेदनात तातडीने चौकशी करून न्याय न दिल्यास संगमनेरचे नागरिक सरकारविरोधात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अविनाश थोरात, शरीफ शेख, बादशहा कुरेशी, सिद्राम दिड्डी, प्राजक्ता बागूल, प्रकाश राठी, कैलास वाकचौरे आणि आप्पा पवार या माजी नगरसेवकांच्या सह्या आहेत.

माहितीसाठी या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ, नाशिकचे विभागीय आयुक्त (नगरपालिका शाखा), अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांना पाठवण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 77
अहिल्यानगर बातम्या आमदार अमोल खताळ एकनाथ शिंदे कवी अनंत फंदी नाट्यगृह खासदार भाऊसाहेब वाकचौरे नाट्यगृह तिकीट विक्री चौकशी नाट्यगृह लोकार्पण वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्याधिकारी दयानंद गोरे राधाकृष्ण विखे पाटील लोकप्रतिनिधींचा अपमान शासन परिपत्रक पायमल्ली संगमनेर नगरपालिका संगमनेर बातम्या संगमनेर माजी नगरसेवक संगमनेर राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

28/11/2026

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Annant Ppangarkar29/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026

आजचे राशीभविष्य – २९ नोव्हेंबर २०२६

29/11/2026

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

28/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.