Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

28/11/2026

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान
धार्मिक

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना करण्यात आली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/11/2026Updated:28/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अहिल्यानगर येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात (दिंडोरी प्रणित) एकाच वेळी २७ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र केंद्राला नुकतेच प्रदान करण्यात आले. 

केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २६ जुलै २०२६ रोजी केंद्राच्या परिसरात २५ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प चंद्रशेखर लोळगे काका यांनी सोडला होता. या अभिनव उपक्रमाला अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या शेजारील जिल्ह्यातील स्वामी समर्थ महाराजांचे भक्त व सेवेकरी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परिणामी २५ हजारांऐवजी तब्बल २७ हजार भाविकांनी सामूहिक स्वामी चरित्र पठण केले.

विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. ‘विनर्स’चे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते या उपक्रमाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार पडलेल्या एका भव्य विशेष समारंभात प्रदान करण्यात आले. लोळगे काका व डॅा. हारके यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

केंद्रातील हरिदास कुमटकर, देवीदास जाधव, अभिजीत नरसाळे, संदीप दुधाडे, किरण भुसे, बाळासाहेब पोकळे, महेश गोसावी, महेश नारखेडे, सतीश अनाप, जालिंदर अरगडे, दीपक लांडे, यशवंत उंडे, सुभाष घोरपडे, आप्पासाहेब गांगुर्डे, लहू लोणकर, नानासाहेब खरात, बाबासाहेब गवांदे, सुरेश आदमाने यांच्यासह केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारचा जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले असल्याचे भाविकांनी यावेळी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 63
अहिल्यानगर न्यूज अहिल्यानगर बातम्या चंद्रशेखर लोळगे काका डॉ. दीपक हारके दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ विनर्स बुक ऑफ इंडिया श्री स्वामी समर्थ सामूहिक पारायण सोहळा स्वामी चरित्र पारायण जागतिक विक्रम स्वामी समर्थ केंद्र बोल्हेगाव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026

संगमनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पालक सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून पाहणी; प्रशासनाला दिले हे कडक निर्देश

27/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

सत्तावीस हजार स्वामी चरित्र पारायणाचा झाला जागतिक विक्रम ! बोल्हेगाव स्वामी समर्थ केंद्राला ‘विनर्स बुक ॲाफ इंडिया’कडून समारंभपूर्वक प्रमाणपत्र केले प्रदान

By Annant Ppangarkar28/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथील बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात (दिंडोरी…

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; संगमनेरमध्ये कामगार विमा डिस्पेंसरीचे लोकार्पण

28/11/2026

“सर्व आपलेच” म्हणणाऱ्या नेतृत्वाच्या उदारतेचा गैरफायदा? काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेसेजने राजकीय खदखद समोर… थोरात साहेब पुन्हा चुकीचं घडतंय!

28/11/2026

संगमनेरमधील कामगारांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा; ‘सेवा दवाखाना’ आणि ‘ईएसआयएस’ रुग्णालय सेवेचा उद्या शुभारंभ

28/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.