संगमनेर:
येथील रहिवासी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य भगवानराव जोशी सर यांच्या पत्नी मनिषा (वय ७५) यांचे गुरुवारी, (दिनांक २९ जानेवारी २०२६) सायंकाळी ५:०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जोशी परिवारावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागरिकांनी जोशी यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पती प्राचार्य भगवानराव जोशी सर, पत्रकार गिरीश आणि श्रीहरी हे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनिषा जोशी या प्रेमळ आणि सुस्वभावी म्हणून परिचित होत्या.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी संगमनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
![]()
मनिषा भगवानराव जोशी यांचे निधन
शिक्षिका असलेल्या मनिषा जोशी या प्रेमळ आणि सुस्वभावी म्हणून परिचित होत्या.


संगमनेर:



