संगमनेर –
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते. आज अजितदादांच्या जाण्याने या ओळींची प्रकर्षाने जाणीव होत आहे. एक कर्ता पुरुष गेला की सगळी समीकरणं कशी बदलून जातात, याचा अनुभव आज महाराष्ट्र घेतोय, अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.https://x.com/i/status/2016384140682395808
तांबे यांनी आपल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये अजितदादांच्या कार्यशैलीचे वर्णन करताना म्हटले की, लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा आणि अत्यंत स्पष्टवक्ता म्हणून दादांची ओळख होती. पण त्याचसोबत, आपली चूक लक्षात आल्यावर ती मान्य करून ‘सॉरी’ म्हणण्याचं मोठं मनही त्यांच्याकडे होतं. असा नेता मिळणं दुर्मिळ आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रशासनावर असलेली पकड आणि कामाचा उरक यासाठी अजितदादा ओळखले जात. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘पॉवरहाऊस’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. “Life is so uncertain… नि:शब्द!” अशा शब्दांत तांबे यांनी आपल्या मनातील दुःख व्यक्त केले आहे.
‘एक कर्ता व्यक्ती गेली की सगळी समीकरणे बदलून जातात…’ आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
लवकर चिडणारा, फटकळ बोलणारा, स्पष्टवक्ता, पण तेवढ्याच लवकर चूक मान्य करून “सॉरी” म्हणणारा नेता गेला.

