अकोले, प्रतिनिधी –
शेळकेवाडी (ता. अकोले) येथील ‘हॉटेल संकेत बार अँड लॉजिंग’ वर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी (३० जानेवारी) धाड टाकली. या धडक कारवाईत पोलिसांनी हॉटेल मॅनेजरला अटक केली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेतमध्ये मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान लॉजिंगच्या रूम नंबर २ मधून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल मॅनेजर सुनील शांताराम शिंदे (वय ४५, रा. शेळकेवाडी, ता. अकोले) याला ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात ‘स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६’ (PITA) च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणात हॉटेल मालक किंवा इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत.
अकोल्यात हॉटेल ‘संकेत’ मधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; मॅनेजरला अटक, तर पीडित महिलेची सुटका
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोल्हार-घोटी रोडवर असलेल्या हॉटेल संकेतमध्ये मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.