Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्राने एक कणखर आणि उमदा नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यावर शोककळा, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, जयश्री थोरात यांनी व्यक्त केल्या शोकभावना
श्रद्धांजली

महाराष्ट्राने एक कणखर आणि उमदा नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यावर शोककळा, बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, जयश्री थोरात यांनी व्यक्त केल्या शोकभावना

अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी – 
स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून, संगमनेरमध्येही शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रशासनावर पकड असलेला उमदा नेता गमावला – बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अनेक वर्षे अजित दादा आणि आम्ही एकत्र काम केले. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि विविध खाती सक्षमपणे सांभाळण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. त्यांची वकृत्व शैली सर्वांना भावणारी होती. राजकीय कारकीर्द ऐन बहरात असताना काळाने घातलेला हा घाला अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर पकड असलेला एक लोकप्रिय आणि उमदा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.”
दमदार प्रशासक हरपला – डॉ. सुधीर तांबे
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे केंद्रस्थानी होते. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. आपल्या कामातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक दमदार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे.”
जनतेच्या मनातील ‘लाडके दादा’ – डॉ. जयश्रीताई थोरात
युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजित दादा हे अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व होते. तत्परतेने काम करण्याची त्यांची पद्धत आणि स्पष्ट बोलणे यामुळे ते जनतेमध्ये ‘दादा’ या नावाने लोकप्रिय झाले. कामातील त्यांचा ‘दादा’पणा आता पुन्हा दिसणार नाही, ही महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी उणीव आहे.”
अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वच स्तरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 506
अजित पवार जयश्री थोरात बाळासाहेब थोरात श्रद्धांजली सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

महात्मा गांधी जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये जयहिंदच्या वतीने विविध उपक्रम; १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी अन् ‘जवाहरलाल हाजीर हो’ पुस्तकाचे प्रकाशन

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महायुती व महाविकास आघाडीने शिवसेनेला विश्वासात न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचे…

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.