Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या बेकायदा घरावर बुलडोझर; अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

या प्रकरणातील मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

राहाता: 

शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर घरावर आणि बांधकामावर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही अशा प्रकारची पहिलीच मोठी कारवाई ठरली असून, यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी राहता येथील एका कार्यक्रमात माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. मतदारसंघात महिलांची छेड काढणाऱ्यांच्या घरावर थेट जेसीबी चालवण्याचा इशारा त्यांनी दिला होता. गुरुवारी झालेल्या या धडक कारवाईमुळे विखे पाटील यांनी आपला शब्द कृतीत आणल्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आहे. दरम्यान, एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने पीडित मुलीला दमदाटी केल्याच्या निषेधार्थ नातेवाईक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. संबंधित महिला अधिकाऱ्याची बदली करावी आणि मुख्य आरोपीला मदत करणाऱ्या इतरांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. याच आंदोलनादरम्यान नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी आरोपीचे बेकायदा घर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार, राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासकीय यंत्रणेने पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या चोख बंदोबस्तात ही मोहीम राबवली. आरोपी गायकवाड याचे ५ ते ६ ठिकाणचे कच्चे व पक्के बेकायदेशीर अतिक्रमण बुलडोझरच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिला व मुलींच्या विरोधात गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी या कारवाईतून कडक बोध घ्यावा, असा इशारा नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 922
अतिक्रमण कारवाई सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.