Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य

05/11/2026

राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण

05/11/2026

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य
आर्थिक

‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य

दिवाळीच्या औचित्याने एस. आर. थोरात डेअरीच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधव, पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेरच्या एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दूध उद्योग समूहाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला सातत्याने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर चालू हंगामात ३१ ऑक्टोबरपर्यंतचे आगाऊ पेमेंट, वाहतूक भाडे, वितरक कमिशन, कर्मचाऱ्यांचा पगार आणि बोनस अशा विविध माध्यमातून एकूण १७ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम दूध उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन आबासाहेब थोरात यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा समूह गेल्या ३३ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील असून थोरात डेअरीने नेहमीच गुणवत्तापूर्ण दूध संकलन, स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तसेच बनावटपणा रोखण्यासाठी प्रभावी कारवाया केल्या. या कारवायांमुळे शुद्ध व गुणवत्तापूर्ण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. या सकारात्मक परिणामांचा प्रत्यक्ष फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून, कंपनीला वर्षभर स्थिर व रास्त दराने दूध खरेदी टिकवून ठेवणे शक्य झाले आहे.
चालू आर्थिक वर्षातही दूध उत्पादनाचा खर्च आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन वर्षभर स्थिर व उच्च दूध खरेदी दर देण्यावर समूहाने विशेष भर दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांचा पशुखाद्यावरील खर्च कमी व्हावा या उद्देशाने २५ टक्के प्रथिने असलेले ‘संगमगिरी डायमंड’ आणि २२ टक्के प्रथिने असलेले ‘संगमगिरी गोल्ड’ हे पशुखाद्य वाजवी दरात उपलब्ध करून दिले जात आहे.
यावेळी संस्थेचे संचालक पृथ्वीराज थोरात यांनी दुष्काळसदृश परिस्थितीवर भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाई, जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करणे आणि पशुधनाचे आरोग्य जपणे ही शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. दुष्काळाचे परिणाम केवळ पुढील पावसाळ्यापर्यंत मर्यादित न राहता शेतीचे उत्पादन पूर्वपदावर येईपर्यंत जाणवू शकतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, एका दुष्काळाचा परिणाम सलग दोन हंगामांवर होत असल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीर्घकालीन परिस्थितीचा विचार करून जलनियोजन, चारा नियोजन, पशुसंवर्धन आणि उपलब्ध शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संचालक देवराज थोरात यांनी सांगितले की, जनावरांचे संगोपन, योग्य आहार व्यवस्थापन, आरोग्याची काळजी आणि दूध उत्पादन वाढ याविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समूहाच्या ‘मी शेतकरी’ आणि ‘संकलन पॉईंट’ या ॲप्सच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट्स दिले जात आहेत.
दिवाळीच्या औचित्याने एस. आर. थोरात डेअरीच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधव, पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 42
आबासाहेब थोरात एस आर थोरात दूध दिवाळी बोनस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची दिवाळी समृद्धीची! थोरात कारखान्याकडून २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग; बाजारपेठेत आनंदाचे वातावरण

04/11/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य

By Annant Ppangarkar05/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दूध उद्योग…

राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण

05/11/2026

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026

आज गुरुवार ०५ नोव्हेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

05/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.