Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

गुंतवणुकीत ट्रेंडपेक्षा उद्दिष्ट, भावनेपेक्षा अभ्यास आणि घाईपेक्षा नियोजन महत्त्वाचे असते. निर्णय घेताना उत्पन्नाचा स्तर, उद्दिष्टे, जोखीम क्षमता व कालावधी विचारात घ्यावा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या प्रभावाखाली येऊन भावनिक गुंतवणुकीचे निर्णय घेणे तरुणांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक ठरू शकते. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुकवरील प्रत्येक माहिती अचूक व सर्वांसाठी योग्य असतेच असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन, योग्य नियोजन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाला प्राधान्य देत तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन गुंतवणूक अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग यांनी केले.

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे-बांगरवाडी येथील व्यवस्थापन विभागाच्या (MBA) वतीने एआयसीटीई प्रशिक्षण व शिक्षण (अटल) अकादमीच्या प्रायोजकत्वाखाली ‘डिजिटल युगातील प्रायोगिक आणि उपयोजित वर्तणूक वित्त’ या विषयावर सहा दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे (FDP) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कडलग बोलत होते.

कडलग पुढे म्हणाले की, रिल्समध्ये लोकप्रिय दिसणारी गुंतवणूक प्रत्येकासाठी योग्य नसते. गुंतवणुकीत ट्रेंडपेक्षा उद्दिष्ट, भावनेपेक्षा अभ्यास आणि घाईपेक्षा नियोजन महत्त्वाचे असते. निर्णय घेताना उत्पन्नाचा स्तर, उद्दिष्टे, जोखीम क्षमता व कालावधी विचारात घ्यावा. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात एपीके फाईल डाउनलोड, संशयास्पद लिंक्स, सायबर अरेस्टची भीती आणि डिजिटल पेमेंट माध्यमांचा गैरवापर करून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने सायबर साक्षरतेसह आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे.

यावेळी विश्वस्त वल्लभ शेळके यांनी आधुनिक डिजिटल युगात बदलणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक वर्तनाचा आणि वर्तनात्मक वित्ताचा सखोल अभ्यास करून प्राध्यापकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी बदलत्या तंत्रज्ञान व उद्योगविश्वाच्या गरजांनुसार प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये देण्यासाठी सतत नवे ज्ञान आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली.

याप्रसंगी व्यासपीठावर लेखापरीक्षक गणेश बडे, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर आणि एमबीए विभागप्रमुख डॉ. महेश भास्कर उपस्थित होते. याच कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘समर्थ शिक्षण’ या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

या सहा दिवसीय उपक्रमात वर्तनात्मक वित्त, डिजिटल अर्थव्यवस्था आणि मानवी वर्तनाचे आर्थिक निर्णयांवरील परिणाम या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व सत्रे पार पडणार आहेत. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके व माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमिता खंडागळे व प्रा. डॉ. शशिकांत ताजने यांनी केले, तर डॉ. रुस्तुम दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 52
गुंतवणूक प्राध्यापक विकास कार्यक्रम सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

29/06/2026

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

24/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या…

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘एक विद्यार्थी, एक बेंच’ उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद; आठवडाभरात ६८ हजारांच्या लोकसहभागातून ४० बेंचचे लोकार्पण

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.