Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद
आर्थिक

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) २०० कोटी रुपये आणि मासिक एसआयपी बुक २ कोटी रुपयांच्या पुढे नेल्याच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

संगमनेर येथील ‘मालपाणी हेल्थ क्लब’ येथे गुरुवारी ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सत्रात उपस्थितांनी आर्थिक नियोजन आणि संपत्ती निर्मितीविषयक मार्गदर्शन घेतले.

सुरत येथील प्रसिद्ध प्रशिक्षक व आर्थिक तज्ज्ञ पलक शाह यांनी या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे देत आर्थिक शिस्त, ध्येय-आधारित गुंतवणूक, महागाईचा प्रभाव, चक्रवाढ व्याजाची ताकद, एसआयपी, वारसा नियोजन आणि मृत्युपत्राचे महत्त्व यांसारख्या मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोगतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश सिकची यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर ‘एनजे वेल्थ’चे विभागीय प्रमुख विक्रमसिंह परदेशी, लेखापरीक्षक सोपानराव देशमुख, ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग, आदित्य कडलग आणि मुख्याध्यापिका वृषाली कडलग उपस्थित होते. कार्यक्रमात उद्घाटक डॉ. ओमप्रकाश सिकची यांचा सत्कार पत्रकार किसन हासे यांच्या हस्ते, तर प्रमुख वक्ते पलक शाह यांचा सत्कार उद्योजक सुदीप वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’ने संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात दोन दशके पूर्ण केल्याबद्दल, तसेच व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) २०० कोटी रुपये आणि मासिक एसआयपी बुक २ कोटी रुपयांच्या पुढे नेल्याच्या निमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध गुंतवणूक करून महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट गाठणाऱ्या पाच प्रमुख गुंतवणूकदारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. उमेश जोशी, शैला रामनाथ देशमुख (वाकचौरे), प्रा. सुनीलदत्त सोमनाथ कडलग, अनिल किसनराव कडलग आणि सुधाकर सखाराम शेटे यांचा समावेश होता. या गुंतवणूकदारांचा सत्कार अनुक्रमे नितीन हासे, सोपानराव देशमुख, प्रवीण वाबळे, रंगनाथ उगले आणि विवेक कासार यांच्या हस्ते झाला.

आपल्या मनोगतात डॉ. ओमप्रकाश सिकची यांनी ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या पारदर्शक व नैतिक सेवांचे कौतुक केले. तसेच विक्रमसिंह परदेशी यांनी सुनील कडलग यांच्या दोन दशकांच्या सातत्यपूर्ण आर्थिक साक्षरतेच्या प्रयत्नांचा गौरव केला. या वेळी आदित्य कडलग यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या दुसऱ्या पिढीने सेबीच्या नवीन ‘स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (SIF)’, ‘PMS’ आणि ‘AIF’ या सेवांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ म्हाळस यांनी केले आणि आभार आदित्य कडलग यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम सोमवंशी, सूरज म्हस्के, स्वाती सरमाडे, मानसी उपासनी, प्रतीक्षा सानप, आकांक्षा डोंगरे व दर्शन गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 694
आर्थिक साक्षरता कडलग इन्व्हेस्टमेंट सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

29/06/2026

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

24/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.