Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड
आर्थिक

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड

चेअरमनपदी पाचव्यांदा निवडून आल्यानंतर सी.ए. कैलास सोमाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: 
शहरातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 
सहकार खात्याचे अधिकारी आर. एस. वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली. यावेळी मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, मावळते व्हाईस चेअरमन संतोष चांडक यांच्यासह संचालक मंडळातील अनिल अट्टल, योगेश जाजू, श्रीकांत मणियार, ज्योती कासट, विशाल नावंदर, अनिल कलंत्री, निलेश बाहेती, योगेश रहातेकर, मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी आणि व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची आर्थिक संस्था म्हणून ओळख असलेल्या महेश नागरी पतसंस्थेचा एकूण व्यवसाय २६२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अत्यंत स्पर्धात्मक व्याजदर, गतिमान कार्यप्रणाली आणि सुलभ कर्जवाटपामुळे या संस्थेचा सर्वत्र मोठा नावलौकिक आहे. संस्थेची थकबाकी अत्यंत कमी असून, सभासदांच्या हितासाठी ही संस्था सातत्याने १५ टक्के लाभांश, दिवाळी भेट आणि वैद्यकीय मदतीसारखे उपक्रम राबवते. याशिवाय ज्येष्ठ सभासदांसाठी १० टक्के व्याजदराची ठेव योजना आणि सभासदांच्या मुलींसाठी गिफ्ट बाँड यांसारख्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे संस्थेने ग्राहकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे.
चेअरमनपदी पाचव्यांदा निवडून आल्यानंतर सी.ए. कैलास सोमाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मावळते पदाधिकारी दिनेश सोमाणी आणि संतोष चांडक यांचे अभिनंदन केले. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या काळात ग्राहकांना अधिक वेगवान आणि प्रगत सेवा देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तसेच, संस्थापक चेअरमन दिवंगत मोहनलालजी मणियार यांनी २२ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असल्याची कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. 
नूतन व्हाईस चेअरमन राजेश लढ्ढा यांनी संस्थेचा स्वनिधी वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगून कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्याला प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले. या निवडीनंतर संस्थेचे संचालक आनंद तापडे, नानासाहेब शेरमाळे, सरला आसावा आणि जयप्रकाश भुतडा यांनी नूतन चेअरमन सी.ए. कैलास सोमाणी व व्हाईस चेअरमन राजेश लढ्ढा यांचे विशेष अभिनंदन केले. निवडीचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने सभासद आणि मित्रपरिवाराने उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या असून, सर्व स्तरांतून या निवडीचे स्वागत होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 678
चेअरमन निवड निवडी महेश नागरी सहकारी पतसंस्था
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026

दुधगंगा पतसंस्था घोटाळा: अखेर ४४ मालमत्ता जप्त; ठेवीदारांना मिळाला न्याय! ७/१२ वर चढणार ‘महाराष्ट्र शासन’

07/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.