Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुधगंगा पतसंस्था घोटाळा: अखेर ४४ मालमत्ता जप्त; ठेवीदारांना मिळाला न्याय! ७/१२ वर चढणार ‘महाराष्ट्र शासन’
आर्थिक

दुधगंगा पतसंस्था घोटाळा: अखेर ४४ मालमत्ता जप्त; ठेवीदारांना मिळाला न्याय! ७/१२ वर चढणार ‘महाराष्ट्र शासन’

या प्रशासकीय कारवाईमुळे फसवणूक झालेले ठेवीदार आणि 'महाराष्ट्र संवाद न्यूज'च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पतसंस्थेच्या कारभारावर आता शासनाचा अंकुश आला असून, दोषींवर कायदेशीर बडगा उगारल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरमधील ‘दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था आणि भ्रष्ट पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ठेवीदारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेची आणि गैरव्यवहारात सामील असलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अरुण उंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, संस्थेचे अध्यक्ष, प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि आणखी काही लोकांच्या मालकीच्या ४४ स्थावर मालमत्तांवर कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन” नाव लावण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
या पतसंस्थेची संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना मुदतीअंती व्याजासह रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्या होत्या, परंतु मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. या गैरव्यवहारामुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाची खात्री पटली आहे. ही संस्था ठेवीदारांचे पैसे परत करण्यास असमर्थ आहे. इतकेच नव्हे तर, ठेवीदारांच्या पैशातून पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या नावे मालमत्ता संपादित केल्याचेही समोर आले आहे.
महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ४ आणि ५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये सुकेवाडी, समनापुर, खंदरमाळवाडी, संगमनेर बुद्रुक, वडझरी, वडगाव लांडगा, घुलेवाडी आणि देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील शेतजमिनींचा समावेश आहे. या मालमत्ता प्रामुख्याने दूधगंगा पतसंस्था, पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दामोधर कुटे, विमलबाई भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, उत्तम शंकर लांडगे, सोमनाथ कारभारी सातपुते, अमोल भाऊसाहेब कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, लहानु गणपत कुटे आणि अजित कृष्णराव कदम यांनी विक्री केलेले सध्याचे मालक शुभम शेखर चंगेडिया यांच्या नावावर किंवा त्यांच्या हिश्श्याच्या आहेत.
आता या सर्व जप्त केलेल्या मिळकतींच्या ७/१२ उताऱ्यावर कब्जेदार म्हणून ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी अरुण उंडे यांनी तहसीलदार संगमनेर आणि राहुरी, तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा त्यात दिरंगाई झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रशासकीय कारवाईमुळे फसवणूक झालेले ठेवीदार आणि ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पतसंस्थेच्या कारभारावर आता शासनाचा अंकुश आला असून, दोषींवर कायदेशीर बडगा उगारल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,164
अरुण उंडे दूधगंगा पतसंस्था महाराष्ट्र शासन मालमत्ता जप्त सातबारा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

01/08/2026

संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!

29/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

By Annant Ppangarkar14/10/20260

माझा गाव माझा अभिमान… राजापूर भाऊसाहेब गणपत हासे, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, राजापूर. (मो.…

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.