शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; नियमित कर्जदारांना २ लाखांचे अनुदान मिळावे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
आताच्या काळात महागाई प्रचंड वाढल्याने सरकारने शेतकऱ्यांना कमीत कमी ७ लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे

तळेगाव दिघे येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह परिसरातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बाबतीत आपण पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
