तमाशा महर्षी रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’; संगमनेरकरांसाठी गौरवाचा क्षण – आमदार खताळ
रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर लोकपरंपरा आणि महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवण्याचे मोठे कार्य केले असून, या पुरस्कारामुळे संपूर्ण तमाशा कलेची मान उंचावली असल्याचे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि संगमनेरचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांनी आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर पारंपरिक लोककलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना होती. मात्र, संगमनेरमधील राजकीय परिवर्तनानंतर आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर यासाठी विशेष पाठपुरावा केला.
रघुवीर खेडकर यांनी आयुष्यभर लोकपरंपरा आणि महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवण्याचे मोठे कार्य केले असून, या पुरस्कारामुळे संपूर्ण तमाशा कलेची मान उंचावली असल्याचे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.