Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या
राजकारण

आधीच मुसळधार, त्यात दूषित पाण्याचा धोका! संगमनेर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर विरोधी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी कडाडल्या… मुख्याधिकाऱ्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी पालिकेने तात्काळ स्वतंत्र नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू करावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ नियमित पाणी तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा संगमनेरकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
शहरातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यासंबंधीचे निवेदन देत तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे संगमनेर शहरातील नाले आणि गटारी तुंबल्या असून अनेक भागांना डबक्याचे स्वरूप आले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे जलवाहिन्या दूषित होण्याचा धोका तर आहेच, शिवाय रस्त्यांवर खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सूर्यवंशी यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर प्रहार करत, शहरातील सर्व नाले आणि गटारींची २४ तासांत साफसफाई करण्याची आणि पाणी साचणाऱ्या भागात तात्काळ पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. तसेच, पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यांवर तातडीने मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करावी, अशीही आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ रस्त्यापुरता मर्यादित नसून वीज पुरवठ्याबाबतही प्रशासनाने गांभीर्य दाखवावे, असे सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. शहरातील बंद असलेले पथदिवे तात्काळ सुरू करण्यात यावेत आणि महावितरण विभागाशी तातडीने समन्वय साधून धोकादायक अवस्थेतील वीज खांब, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा व स्ट्रीट लाईटची तपासणी करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, असे त्यांनी खडसावून सांगितले आहे.
नदी परिसरात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीचा दाखला देत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सुस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नदीकाठच्या भागात आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना २४ तास हायअलर्टवर ठेवण्यात यावे, तसेच नदी, पूल व बंधाऱ्यांवर धोक्याचे सूचना फलक लावून प्रशासनाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी पालिकेने तात्काळ स्वतंत्र नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू करावा, असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान सूर्यवंशी यांनी प्रशासनाला धारेवर धरण्यासोबतच संभाव्य धोके लक्षात घेत संगमनेरच्या जनतेलाही स्वतःच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. नदी व ओढ्यांचा प्रवाह वाढलेला असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पात्रात उतरू नये, तसेच पूरस्थिती पाहण्यासाठी अथवा ‘सेल्फी’ आणि छायाचित्रे काढण्यासाठी नदी परिसरात गर्दी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे त्यांनी बजावले आहे. पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल किंवा बंधाऱ्यांवरून वाहने नेण्याचा किंवा चालत जाण्याचा धाडसी प्रयत्न करू नये आणि लहान मुलांना नदी परिसरात एकटे सोडू नये, असे सांगतानाच त्यांनी वीज खांब, तुटलेल्या विद्युत तारा किंवा पाण्यात बुडालेल्या उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी स्वच्छ आणि उकळूनच वापरावे, असे सांगत प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 686
निवेदन नैसर्गिक आपत्ती मुख्याधिकारी संगमनेर नगरपालिका साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.