Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

27/11/2026

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्यास प्राधान्य देणार : अभिनेते सुबोध भावे

27/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ
राजकारण

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

संगमनेरच्या दुष्काळी आणि अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे माझे प्राधान्य आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील साकूर पठार भागातील १५ गावांमधील ९०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देणाऱ्या साकूर पठार उपसा जलसिंचन योजनेसाठी २२४.९४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला असून, या प्रस्तावाला ‘खास बाब’ म्हणून लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालनात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमनेर तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील पाणीप्रश्नासंदर्भात आयोजित या बैठकीत खरशिंदे, शिंदोडी, बिरेवाडी, मांडवे बुद्रुक, साकूर, वरवंडी, रणखांब, ठाकुरवाडी, दरेवाडी, चौधरवाडी, कौठे मलकापूर, जांभुळवाडी, हिवरगाव पठार, कुंभारवाडी आणि कणसेवाडी या १५ गावांतील शेतकऱ्यांसाठी मुळा धरणाच्या जलाशयातून साकूर उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी ४.४९३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून सर्वेक्षण, अन्वेषण आणि संकल्पनांचे कामही पूर्ण झाले आहे. तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर झालेल्या या २२४.९४ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष मान्यता मिळवण्यासाठी पुढील कार्यवाही वेगाने सुरू आहे.

याच बैठकीत दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून भोजापूर परिसरातील १८ मुख्य गावांचा समावेश करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच, निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या संगमनेर मतदारसंघातील गावांचा सिंचनाचा प्रश्नही आमदार खताळ यांनी प्रभावीपणे मांडला. उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पातून भंडारदरा आणि निळवंडे धरणातून उपलब्ध होणारे १५ टीएमसी पाणी प्रवरा खोऱ्यात येणार असून, या पाण्याद्वारे या गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भोजापूर परिसरातील सिंचनासोबतच भोजापूर पूरचारीच्या कामांना गती देण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पूरचारीच्या कामांची प्रत्यक्ष सद्यस्थिती जाणून घेणे, स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मागणीनुसार चारीचे रुंदीकरण करणे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी येत्या ५ डिसेंबर रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांसह प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार आहे. केवळ प्रस्तावांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांना गती देऊन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस लाभक्षेत्र विकास सचिव प्रकाश मिसाळ, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, सहसचिव प्रसाद नार्वेकर, मुख्य अभियंता अरुण नाईक आणि अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संगमनेरच्या दुष्काळी आणि अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे माझे प्राधान्य आहे. साकूर उपसा सिंचन योजना, भोजापूर परिसरातील १८ गावांचा नदीजोड प्रकल्पात समावेश आणि निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या महत्त्वपूर्ण विषयांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मनःपूर्वक आभार. — अमोल खताळ, आमदार.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 94
अहिल्यानगर जिल्ह्यातील बातम्या आमदार अमोल खताळ एकनाथ शिंदे जलसंपदा विभाग देवेंद्र फडणवीस नदीजोड प्रकल्प निळवंडे धरण भोजापूर पूरचारी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र संवाद न्यूज मुळा धरण राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर साकूर उपसा सिंचन योजना साकूर पठार सिंचन प्रकल्प सुनेत्रा पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्यास प्राधान्य देणार : अभिनेते सुबोध भावे

27/11/2026

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

27/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

साकूर उपसा सिंचन योजनेच्या २२४.९४ कोटींच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहर उमटणार; १५ गावांतील ९०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार : आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar27/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर विधानसभा मतदारसंघातील साकूर पठार भागातील १५ गावांमधील ९०० हेक्टर क्षेत्राला…

संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान दिन साजरा; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

27/11/2026

संगमनेरच्या अत्याधुनिक नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्यास प्राधान्य देणार : अभिनेते सुबोध भावे

27/11/2026

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

27/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.