Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

27/11/2026

पालक सचिव प्रवीण दराडे आज संगमनेर दौऱ्यावर; टंचाईग्रस्त गावांची करणार पाहणी

27/11/2026

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता
राजकारण

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

३० नोव्हेंबरपासून सभागृहात विधेयक मांडले जाते का आणि विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकातील प्रस्तावित बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात लोकसभेच्या सध्याच्या जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ५४३ जागांची संख्या वाढून ८१५ वर पोहोचण्याची शक्यता आहे. 

तसेच, प्रस्तावित तरतुदीनुसार नवीन जागांचे वाटप पुढील २५ वर्षांसाठी म्हणजेच २०५१ पर्यंत गोठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेचे हे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान प्रस्तावित असून, या कालावधीत केंद्र सरकारकडून ही महत्त्वाची विधेयके सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते; मात्र, दोन-तृतीयांश बहुमताअभावी ते फेटाळले गेले होते. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि द्रमुक या पक्षांनी ५० टक्के जागा वाढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली होती. या वाढीव जागांमुळे राज्यांच्या प्रतिनिधित्वावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावाही करण्यात येत आहे.

विशेष अधिवेशनात विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभेत घटनादुरुस्तीसाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असल्याने राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही या अधिवेशनासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, ३० नोव्हेंबरपासून सभागृहात विधेयक मांडले जाते का आणि विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 74
केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय घटना दुरुस्ती विधेयक नरेंद्र मोदी परिसीमन भारतीय राजकारण मतदारसंघ पुनर्रचना महाराष्ट्र संवाद न्यूज महिला आरक्षण विधेयक लोकसभा जागा वाढ लोकसभा निवडणूक संसद विशेष अधिवेशन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026

संगमनेर पालिकेचा ‘नाट्यमय’ कारभार! नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर सीओंची पलटी; लोकार्पण झालेच नाही तर मग सोहळ्यात मुख्याधिकारी ‘नटून थटून’ का मिरवत होते? संगमनेर नाट्यगृह वादावर जनतेचा संताप

26/11/2026

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होण्याची शक्यता

By Annant Ppangarkar27/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

पालक सचिव प्रवीण दराडे आज संगमनेर दौऱ्यावर; टंचाईग्रस्त गावांची करणार पाहणी

27/11/2026

पाणीटंचाई आणि चारा प्रश्नावर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर; पालक सचिवांचे महत्त्वाचे निर्देश

26/11/2026

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.