Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

26/11/2026

नाट्यगृहावरून राजकीय नाट्य रंगले… विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने; ३.३३ लाखाची मदत दुष्काळ निधीसाठी: गटनेत्या दिपाली पंचारिया

26/11/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात
राजकारण

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

भाजपकडून व्यक्त होणारा संविधानप्रेमाचा दावा म्हणजे 'पुतणा मावशीचे प्रेम' असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

देशाचे संविधान, लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार टिकवण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून संघर्ष उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे येथे आयोजित संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संविधान रक्षणाची शपथ दिली. रॅलीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, शोभा बच्छाव, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण, शिवाजी काळगे, आमदार भाई जगताप, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, रमेश बागवे, सुनीता गावंडे, मुजफ्फर हुसेन, चरणसिंग सप्रा, मोहन जोशी, ॲड. गणेश पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधानामध्ये साधुसंतांचे विचार तसेच समता, बंधुता आणि सर्वधर्मसमभावाची मूल्ये सामावलेली असून त्यावरच देशाची लोकशाही उभी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मात्र भाजप सरकारकडून या मूल्यांवर घाला घालण्याचे आणि लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदानाचा अधिकार सुरक्षित राहिला नाही तर लोकशाहीचा पाया ढासळेल, त्यामुळे मतांची चोरी आणि जनतेचा कौल डावलण्याच्या प्रकारांविरोधात नागरिकांनी जागरूक होऊन पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. संविधान वाचवण्याची जबाबदारी केवळ एका पक्षाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्मांना, महिलांना आणि वंचित समाजाला समान अधिकार तसेच व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. मात्र मोदी-शाह सरकार हे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत असून संविधान टिकले तरच देश टिकेल, असे मत डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी व्यक्त केले.

संविधाननिर्मितीच्या काळात गोळवलकर यांनी मनुस्मृतीच्या आधारे संविधानाची भूमिका मांडल्याचा उल्लेख करत, मनुस्मृती आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ला महत्त्व देणाऱ्या भाजपकडून व्यक्त होणारा संविधानप्रेमाचा दावा म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकशाहीची हत्या ठाण्यातूनच झाली असल्याची जाणीव ठेवून येथे रॅली काढण्यात आल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. मतदानातील गैरप्रकार तसेच गोकुळमधील सत्ता बळकावल्याचा आरोप करत राज्यात शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

भाजप सरकारकडून लोकशाही व संविधानाची पायमल्ली सुरू असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संविधानाच्या रक्षणासाठी लढा देत असल्याचे नसीम खान यांनी नमूद केले. सर्व जाती, धर्म, भाषा आणि पंथांच्या नागरिकांना मिळालेल्या समान अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, भाई जगताप आणि मुजफ्फर हुसेन यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत आपली भूमिका मांडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 88
काँग्रेस ठाणे बाळासाहेब थोरात भाजप महाराष्ट्र राजकारण लोकशाही सतेज पाटील संविधान दिन संविधान बचाव रॅली हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाट्यगृहावरून राजकीय नाट्य रंगले… विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने; ३.३३ लाखाची मदत दुष्काळ निधीसाठी: गटनेत्या दिपाली पंचारिया

26/11/2026

संगमनेरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनात विचित्र समीकरण; सूत्रसंचालनाच्या ‘अजब’ राजकीय गणितावर ठाकरे सेनेचे अमर कतारी यांचा थेट हल्लाबोल!

26/11/2026

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

ठाण्यात काँग्रेसची संविधान बचाव रॅली… संविधान रक्षणासाठी पुन्हा स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेतून लढा आवश्यक: बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar26/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशाचे संविधान, लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार टिकवण्यासाठी पुन्हा…

नाट्यगृहावरून राजकीय नाट्य रंगले… विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून प्रसिद्धीपत्रक काढले, कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे लोकार्पण दुष्काळामुळे साध्या पद्धतीने; ३.३३ लाखाची मदत दुष्काळ निधीसाठी: गटनेत्या दिपाली पंचारिया

26/11/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026

संगमनेरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनात विचित्र समीकरण; सूत्रसंचालनाच्या ‘अजब’ राजकीय गणितावर ठाकरे सेनेचे अमर कतारी यांचा थेट हल्लाबोल!

26/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.