Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026

संगमनेरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनात विचित्र समीकरण; सूत्रसंचालनाच्या ‘अजब’ राजकीय गणितावर ठाकरे सेनेचे अमर कतारी यांचा थेट हल्लाबोल!

26/11/2026

२६ नोव्हेंबर २०२६ – आजचे राशिभविष्य

26/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे टाकून १ लाख ८८ हजार ३८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे, अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, विष्णु भागवत, सोमनाथ झांबरे, निळकंठ कारखेले, भगवान सानप, किशोर शिरसाठ, योगेश कर्डीले, अतुल लोटके, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, रोहित मिसाळ, संभाजी कोतकर, विजय पवार, अभिजीत अरकल, बाळासाहेब गुंजाळ, अजिनाथ पाखरे, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, सुनिल मालणकर, भगवान थोरात, राहुल डोके आणि रमीजराजा आत्तार यांची सहा स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन रवाना करण्यात आले होते.

या पथकांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी करत अवैध दारू विक्रीचे २४ आणि जुगाराचे १३ असे एकूण ३७ गुन्हे दाखल केले.

अवैध दारू विक्रीविरोधात केलेल्या कारवाईत नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ९ गुन्हे दाखल करत १ लाख २६ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कोपरगाव तालुका येथे ४ गुन्ह्यांत ११ हजार ५५० रुपये, कोपरगाव शहर येथे ४ गुन्ह्यांत ९ हजार ६०० रुपये, शेवगाव येथे ३ गुन्ह्यांत १३ हजार २६० रुपये, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्ह्यांत २ हजार ६८० रुपये, राहाता येथे १ गुन्ह्यात ५ हजार ३७५ रुपये आणि शिर्डी येथे १ गुन्ह्यात २ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यासोबतच अवैध जुगार अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत ३ गुन्हे दाखल करून ७ हजार ५०० रुपये, एमआयडीसी येथे ३ गुन्ह्यांत २ हजार २३० रुपये, शेवगाव येथे ३ गुन्ह्यांत १ हजार ७५० रुपये, नगर तालुका येथे २ गुन्ह्यांत १ हजार ८५० रुपये, राहाता येथे १ गुन्ह्यात १ हजार ७५० रुपये आणि शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत १ गुन्ह्यात १ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 89
अवैध दारू अवैध धंदे अहिल्यानगर कोपरगाव जुगार अड्डा पोलिस कारवाई महाराष्ट्र संवाद मुद्देमाल जप्त शिर्डी शेवगाव स्थानिक गुन्हे शाखा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

24/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar26/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर…

संगमनेरच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनात विचित्र समीकरण; सूत्रसंचालनाच्या ‘अजब’ राजकीय गणितावर ठाकरे सेनेचे अमर कतारी यांचा थेट हल्लाबोल!

26/11/2026

२६ नोव्हेंबर २०२६ – आजचे राशिभविष्य

26/11/2026

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष

25/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.