Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

25/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा
गुन्हेगारी

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

परमार हे यापूर्वी अहिल्यानगर तसेच संगमनेरमध्ये काही काळ नोकरीस होते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळलेल्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरोधातच महिला रहिवाशाचा विनयभंग, तिच्या पतीला मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनीत घडलेल्या या घटनेमुळे सोसायटी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी निवृत्त पोलिस अधिकारी अभय परमार यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अभय परमार हे यापूर्वी अहिल्यानगर तसेच संगमनेरमध्ये काही काळ नोकरीस होते, त्यामुळे या घटनेची चर्चा स्थानिक पातळीवरही रंगली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी या ४८ वर्षीय विवाहिता असून त्या गेल्या २० वर्षांपासून एका बँकेत कार्यरत आहेत. रविवारी (ता. २२ नोव्हेंबर) दुपारी बाराच्या सुमारास सोसायटीच्या वॉचमनचा त्यांच्या पतीला फोन आला आणि चारचाकी गाडी धुण्यासाठी इमारतीच्या मागील बाजूला आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पती गाडी घेऊन इमारतीच्या पाठीमागे गेले असता, त्याच सोसायटीत राहणारे अभय परमार तिथे आले आणि त्यांनी पतीला गाडीतून खाली बोलावले. गाडीतून खाली उतरताच जुन्या भांडणाचा राग मनात धरून परमार यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या उजव्या डोळ्यावर आणि शरीरावर हाताने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पतीला मारहाण सुरू असल्याचे समजताच फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी तातडीने घटनास्थळी धावल्या. मात्र, त्या ठिकाणी गेल्यावर वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळला. उपस्थित नागरिकांच्या समोरच परमार यांनी फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच ‘तुमच्याकडे बघून घेऊ,’ अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून गेले. या वर्तनामुळे आपल्याला तीव्र मानसिक त्रास झाला आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य घडल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. हा संपूर्ण प्रकार सुरू असताना सोसायटीतील हेमंत दाभाडे यांनी तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना पाचारण केले. या दरम्यान परमार यांनी दाभाडे यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीही कोणत्याही कारणाशिवाय परमार यांनी आपल्याला आणि कुटुंबीयांना शिवीगाळ केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

या ताज्या घटनेमुळे अभय परमार यांच्या पोलिस खात्यातील जुन्या कारकिर्दीची आणि वादांचीही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अभय परमार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात आणि संगमनेरमध्येही काही काळ सेवा बजावली होती. एप्रिल २०१८ मध्ये ते अहिल्यानगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना केडगाव येथे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडानंतर कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात झालेल्या कथित त्रुटी आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाने परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आणि या हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. तसेच संगमनेर येथील कारकिर्दीची ही चर्चा रंगली आहे.

मॉडेल कॉलनीतील या प्रकारानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांना त्रास देणे, धमकावणे आणि आक्रमक वर्तन करणे याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी असो वा सर्वसामान्य नागरिक, कायदा सर्वांसाठी समान आहे, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच तक्रारदार महिला व त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसे संरक्षण देऊन त्यांच्यावर कोणताही दबाव येऊ देऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 67
अभय परमार अहिल्यानगर केडगाव हत्याकांड धमकीचा गुन्हा निवृत्त पोलिस अधिकारी पोलिस कारवाई मॉडेल कॉलनी पुणे विनयभंग आणि मारहाण शिवाजीनगर पोलिस संगमनेर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

24/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

By Annant Ppangarkar25/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळलेल्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरोधातच महिला…

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

25/11/2026

गुरुनानकांचे विचार : मानवतेचा प्रकाश आणि समतेचा महामंत्र!

24/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.