Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष

25/11/2026

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष
महाराष्ट्र संवाद विशेष

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष

दोन दिवसांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संगमनेरची नाट्यकलेवरील निष्ठा पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

नूतनीकरण करून अत्याधुनिक सुविधांनी सज्ज झालेल्या एक हजार प्रेक्षक क्षमतेच्या ‘कवी अनंत फंदी नाट्यगृहा’चा शुभारंभ सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या विनोदी नाट्यप्रयोगांनी उत्साहात पार पडला. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन नाटकांच्या प्रयोगांनी संगमनेरकर रसिकांना खळखळून हसवतानाच नव्या नाट्यगृहाच्या भव्यतेची आणि आधुनिकतेचीही प्रचिती दिली.

साहित्य, कला आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या संगमनेरच्या इतिहासात कवी अनंत फंदी, शाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर, लावणीसम्राज्ञी कांताबाई सातारकर आणि पद्मश्री रघुनाथ खेडकर यांसारख्या अनेक कलावंतांनी मोलाची भर घातली आहे. हाच वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेने नाट्यगृहाचे नूतनीकरण करून ते रसिकांच्या सेवेत दाखल केले आहे.

शुभारंभाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांच्या ‘शिकायला गेलो एक’ या विनोदी नाटकाचा प्रयोग सादर झाला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली. पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, दुरावा आणि तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशातून रंगणाऱ्या गंमतीदार प्रसंगांनी रसिकांना दोन तास खिळवून ठेवले. दोन्ही प्रयोगांना संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नाटकांचा आनंद घेण्याबरोबरच अत्याधुनिक नाट्यगृह पाहण्यासाठी विविध शहरांतील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि कलाप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. नाट्यगृहाची सुसज्ज आसनव्यवस्था, भव्य रंगमंच आणि आधुनिक सुविधा पाहून मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच नगरपालिका प्रशासनाचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी खासदार शोभाताई बच्छाव, आमदार विवेक कोल्हे, आमदार सत्यजित तांबे, आमदार मोनिकाताई राजळे, सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नूतनीकरणात योगदान देणारे अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. नगरपालिकेच्या नगरसेवकांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते संगमनेरच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. तर ‘2.0’मध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अवघ्या एका वर्षात नाट्यगृहाचे काम पूर्ण झाल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी समाधान व्यक्त केले.

स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि रसिकांना दर्जेदार मनोरंजनाची पर्वणी देणारे हे नाट्यगृह आगामी काळात कला, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाचे प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संगमनेरची नाट्यकलेवरील निष्ठा पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 5
एक लग्नाची दुसरी गोष्ट कवी अनंत फंदी नाट्यगृह नाट्यगृह उद्घाटन प्रशांत दामले मराठी रंगभूमी शिकायला गेलो एक संगमनेर सत्यजीत तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष

By Annant Ppangarkar25/11/20260

नूतनीकृत कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा दणक्यात शुभारंभ; प्रशांत दामलेंच्या नाटकांनी दोन दिवस रंगला हास्याचा जल्लोष…

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

25/11/2026

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजीचे राशिभविष्य

25/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.