Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 13, 2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
राजकारण

संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मिळणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला परिवहन मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

काही तांत्रिक कारणांमुळे स्वतंत्र RTO ऐवजी स्वतंत्र कॅम्प ऑफिस मंजूर करण्यात आले. मात्र, ते अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने कॅम्प ऑफिस तातडीने सुरू करावे आणि पुढे संगमनेर–अकोलेसाठी स्वतंत्र RTO मंजूर करावे
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJuly 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:
आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश येण्याची चिन्हे असून संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार तांबे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आणि अकोले परिसरासाठी नव्या निकषांनुसार स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करत परिवहन मंत्र्यांनी नव्या शासन अध्यादेशातील निकषांच्या आधारे संगमनेरसाठीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुख्य व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, सध्या वाहन नोंदणी, परवाने आणि इतर परिवहन सेवांसाठी स्थानिक नागरिकांना दूरवरच्या आरटीओ कार्यालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे सर्वसामान्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असल्याने येथे स्वतंत्र कार्यालयाची अत्यंत गरज आहे.
या लोकोपयोगी प्रश्नावर आमदार सत्यजीत तांबे गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. २४ मार्च २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर तांत्रिक कारणांमुळे स्वतंत्र आरटीओ ऐवजी कॅम्प ऑफिस मंजूर झाले होते, मात्र ते अद्याप सुरू न झाल्याने ते तातडीने कार्यान्वित करून पुढे त्याचे रूपांतर स्वतंत्र आरटीओ मध्ये करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी विधान परिषदेत हा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. संगमनेर आणि परिसरातील लाखो नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि सुलभ परिवहन सेवा मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार तांबे यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा-
📌 २४ मार्च २०२५ : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संगमनेरसाठी स्वतंत्र RTO कार्यालयाची मागणी करण्यात आली. त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे स्वतंत्र RTO ऐवजी स्वतंत्र कॅम्प ऑफिस मंजूर करण्यात आले. मात्र, ते अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने कॅम्प ऑफिस तातडीने सुरू करावे आणि पुढे संगमनेर–अकोलेसाठी स्वतंत्र RTO मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
📌 जुलै २०२५ (पावसाळी अधिवेशन) : विधान परिषदेत संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याचा प्रश्न पुन्हा प्रभावीपणे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 481
आरटीओ प्रताप सरनाईक सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे रेल्वे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीकडून तीव्र निषेध

August 8, 2026

संगमनेर तालुक्यासाठी ३५७ मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक खुला; आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर कृषी विभागाची कारवाई

August 7, 2026

डॉ. अनिल काकोडकर यांना हटवा, अन्यथा आंदोलन तीव्र करणार; नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीचा इशारा

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By अनंत पांगारकरAugust 13, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी नवीन…

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

August 12, 2026

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

August 12, 2026

हॉटेल सुरभीपर्यंत पोहोचले बनावट दारूचे धागेदोरे; आस्थापना कायमस्वरूपी सील करा, शिवसेनेच्या (ठाकरे गट) अमर कतारी यांची मागणी

August 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.