Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत सेनेची तोफ धडाडणार! खासदार संजय राऊत यांची २ जूनला भव्य जाहीर सभा; निष्ठावान शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी आणि शहरप्रमुख अमित चव्हाण यांचे आवाहन
राजकारण

शिर्डीत सेनेची तोफ धडाडणार! खासदार संजय राऊत यांची २ जूनला भव्य जाहीर सभा; निष्ठावान शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी आणि शहरप्रमुख अमित चव्हाण यांचे आवाहन

राज्यातील सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडी, पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटन बळकटीकरण यावर खासदार संजय राऊत या सभेतून कडाडणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी:

हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सध्या विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांचा धडाका सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसैनिकांना आगामी संघर्षासाठी सज्ज करण्यासाठी शिर्डीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची तोफ या सभेत धडाडणार असून, त्यांच्या झंझावाती मार्गदर्शनामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापणार आहे.

ही सभा मंगळवारी, (२ जून) दुपारी बारा वाजता शिर्डी येथील एअरपोर्ट रोडवरील ‘साई किमया गार्डन लॉन्स’ येथे पार पडणार आहे. या सभेला माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वरळीचे आमदार सुनील शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडी, पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटन बळकटीकरण यावर खासदार संजय राऊत या सभेतून कडाडणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

या भव्य जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक सभेसाठी उत्तर नगर जिल्ह्यातील, विशेषतः शिर्डी परिसरातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांनी, नागरिकांनी आणि भगवाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी आणि शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी केले आहे. शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वाभिमानी शिवसैनिकांनी या सभेला उपस्थित राहून शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी, असेही कतारी आणि चव्हाण यांनी शेवटी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 454
अमर कतारी अमित चव्हाण शिर्डी सभा संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.