Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन
न्यायालय

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

अर्जदार आरोपीच्या वतीने अ‍ॅडव्होकेट एस. के. पवार यांनी बाजू मांडली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/05/2026Updated:29/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान, विविध गंभीर कलमांसह जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. राजेंद्र बापू गडगे (वय ५३ वर्षे) असे जामीन मंजूर झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र गडगे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८, ३१९, ३५६, ३५२, ३५३, ३३६(४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याशिवाय औषध आणि चमत्कारिक उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ चे कलम ७ आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा १९६१ च्या कलम ३३ आणि ३६ अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले होते.

याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात आला.

अर्जदार आरोपीच्या वतीने अ‍ॅडव्होकेट एस. के. पवार यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज काही अटी व शर्तींवर मंजूर केला.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना आरोपीला ६०,००० रुपयांचा वैयक्तिक बंधपत्र आणि तेवढ्याच रकमेचा एक किंवा दोन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, गुन्ह्यातील फिर्यादी किंवा साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू नये, त्यांच्यावर दबाव आणू नये किंवा त्यांना धमकावू नये, अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली आहे.

तपासकामात किंवा पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड न करण्याची अटही घालण्यात आली आहे. यासोबतच, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलावले, तेव्हा पोलीस ठाण्यात हजर राहून तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,461
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय जामीन अर्ज राजेंद्र गडगे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.