Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पीकविमा भरपाई न मिळाल्यास संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन! शेतकरी संघटना व तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांचा इशारा
आंदोलन

पीकविमा भरपाई न मिळाल्यास संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन! शेतकरी संघटना व तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांचा इशारा

शेतकरी संघटनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/05/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

गत खरीप हंगामामधील पीकविमा नुकसान भरपाई अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये वाटप करण्यात आली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईतून अन्यायकारक रीतीने वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या २९ मे पर्यंत तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा नुकसान भरपाई जमा न झाल्यास, संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागील खरीप हंगामात संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली होती. संगमनेर तालुक्यातही या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, महसूल व कृषी विभाग प्रशासनाने अंतिम पीक कापणी अहवाल तयार करताना प्रत्यक्ष शेतात न जाता, केवळ टेबलावर बसून हलगर्जीपणे पंचनामे केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील उंबरठा उत्पादन प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा जास्त दाखविले गेले. जर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे केले असते, तर नुकसानीची खरी आकडेवारी आणि मागील ५ वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी उंबरठा उत्पादन झाल्याचे स्पष्ट झाले असते. अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये उंबरठा उत्पादन कमी नोंदवले गेले असताना, केवळ संगमनेर तालुक्यात ते जास्त दाखविल्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत.

या अन्यायाविरुद्ध शेतकरी संघटना अहिल्यानगरच्या वतीने ११ मे रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुधाकर बोराळे यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन पाठवले आहे. या निवेदनाद्वारे शासनाला २९ मे पर्यंत पीकविमा भरपाई देण्याची मुदत देण्यात आली असून, तसे न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन देतेवेळी शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष रमेश शिंगोटे, जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीताताई वानखेडे, बाळासाहेब घोगरे, सोमेश्वर साबळे, गणपत फटांगरे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 604
अरुण उंडे कृषी विभाग निवेदन नुकसान भरपाई पिक विमा शेतकरी संघटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.