Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका
गुन्हेगारी

श्रीरामपूर विभागातील ६८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई; अपर पोलीस अधीक्षकांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका

नागरिकांना अशा प्रतिबंधित क्षेत्रांत हद्दपार व्यक्ती वावरत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/07/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

श्रीरामपूर: 

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवरिुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सन २०२५ व २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील एकूण ६८ सराईत आरोपींवर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्यानुसार मानवी जीवितास किंवा मालमत्तेस भय, इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ व ५६ च्या तरतुदीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील सोमनाथ भाऊराव कुदळे, अरबाज एजाज बागवान, अरबाज आयुब पठाण, मनोज संजय साबळे उर्फ मनोहर साबळे, सौरभ संजय शिंदे, सागर भाऊसाहेब कुदळे, ओंकार शंकर साळवे उर्फ भोला साळवे, झीशान अब्दुल गणी शेख, मोसिन उर्फ बुंदी इसा कुरेशी, दीपक बबन जाधव आणि बबलू दिलीप शेळके या अकरा गुन्हेगारांना प्रत्येकी १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील ऋषिकेश भाऊसाहेब भगत, नागेश संजय चव्हाण, रामप्रसाद रत्नाकर वाडे उर्फ रामा वाडे, संजय चंद्रकांत नेतावले, आरिफ गफुर शेख आणि योगेश सोपान बायकर यांना प्रत्येकी १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अक्षय अशोक मते आणि सनि उर्फ रितेश खंडू जाधव यांनाही १ वर्षासाठी तडीपार केले आहे. नेवासा आणि सोनई पोलीस ठाणे हद्दीतील सागर वसंत नेटके, गुड्या उर्फ प्रति दौलत आरण, वसंत उर्फ कोंडीराम दानियेल गाडे, सूरज कैलास परदेशी, शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख आणि निलेश मधुकर केदार या सहा गुन्हेगारांवर प्रत्येकी २ वर्षांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील अजय दिलीप डाखरे, चेतन सुनील शिरसाठ आणि सचिन संजय साळुंखे यांना प्रत्येकी १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. राहाता पोलीस ठाणे हद्दीतील प्रमोद हरी लोखंडे आणि प्रविण उर्फ पठ्या नानासाहेब वाघमारे यांना १ वर्षासाठी, तर शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश आप्पासाहेब शेजवळ, सुदर्शन शशिकांत वाणी आणि करण सुरेश आव्हाड यांना १ वर्षासाठी आणि अक्षय सुभाष शिंदे, बाल्या उर्फ सौरभ विकी रोजारीओ व शरद गोटीराम फुंदे यांना प्रत्येकी २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

संगमनेर विभागातील राजेंद्र तुकाराम सानप आणि राजिक रज्जाक शेख यांना १ वर्षासाठी हद्दपार केले आहे. अकोले व घारगाव हद्दीतील संकेत पांडुरंग खरात, सागर विजय खरात, अनिल निवृत्ती खरात, दत्तात्रय निवृत्ती खरात, बाळू किसन चौधरी आणि गणेश बबन कुरकुटे या सहा गुन्हेगारांना प्रत्येकी ६ महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये श्रीरामपूर शहरातील पहिल्या टोळीतील अब्दुल गणी कुरेशी व एजाज कादर कुरेशी यांना १ वर्षासाठी, तर दुसऱ्या टोळीतील अरबाज मस्तान शेख व गौरव रमेश सोनटक्के यांना १ वर्षासाठी हद्दपार केले आहे. राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील तिसऱ्या टोळीतील दीपक बबन लाठे, निखिल बबन लाठे, शहादेव विठ्ठल माने, अभिषेक राजेंद्र नाचणे, गणपत बबन गफले व संदीप गोपीनाथ लाठे आणि चौथ्या टोळीतील अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, आकाश अशोक मंडलिक व राहुल अंबादास पिटकर या सर्व नऊ आरोपींना १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

लोणी पोलीस ठाणे हद्दीतील पाचव्या टोळीतील फैजान जब्बार कुरेशी, मुन्तजीर मुनिर कुरेशी, अब्दुलकरीम अमर कुरेशी, मुनिर अमिर कुरेशी, जब्बार हसन कुरेशी, नाजीम आयुब कुरेशी, वसीम आयुब कुरेशी आणि रिजवान मेहबुब कुरेशी या आठ जणांच्या टोळीला १ वर्ष ६ महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील सहाव्या टोळीतील सागर उर्फ मोद्या रामदास मंजुळ, अतुल देविदास आव्हाड आणि भारत भाऊसाहेब आव्हाड या तीन आरोपींना १ वर्षाच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून जर कोणतीही प्रतिबंधित व्यक्ती पुन्हा त्या भागात आल्यास तिच्यावर गुन्हा दाखल करून पुढील गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांना अशा प्रतिबंधित क्षेत्रांत हद्दपार व्यक्ती वावरत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 611
तडीपार सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.