Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!
गुन्हेगारी

संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!

आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2026Updated:30/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शहरातील आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्फत संगमनेर उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी हा निर्णय दिला. त्यांनी उपविभागातील एकूण ८ सराईत गुन्हेगारांचा गुन्हेगारी आलेख तपासून त्यांना अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून ६ महिने ते १ वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडाली असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी हे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केले. या प्रस्तावांची कसून चौकशी केल्यानंतर ते मंजुरीसाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठवण्यात आले होते, प्रांत अधिकारी उंडे यांनी यावर अंतिम शिक्कामोर्तब करून हे तडीपारीचे आदेश पारित केले. या कारवाईत तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोशी येथील सराईत गुन्हेगार राजेंद्र तुकाराम सानप याला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
तसेच अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोतुळ येथील रहिवासी संकेत पांडुरंग खरात, सागर विजय खरात, अनिल निवृत्ती खरात आणि दत्तात्रय निवृत्ती खरात या चौघांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अकोले तालुक्यातीलच धामणगावपाट येथील सराईत गुन्हेगार किसन वाळु चौधरी यालाही ६ महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर काढण्यात आले आहे.
याशिवाय, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मदीनानगर येथील शेख राजिक रज्जाक याला १ वर्षासाठी, तर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुटवाडी येथील गणेश बबन कुरकुटे याला ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
या सर्व गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आदेशानुसार या सर्वांना अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका या भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,813
अरुण उंडे कुणाल सोनवणे हद्दपार कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रस्त्यावरील वाहनांच्या वादातून पिकअप चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या…

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.