Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील जमजम कॉलनीत अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३ आरोपी गजाआड ६ फरार, १५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

संगमनेरमधील जमजम कॉलनीत अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; ३ आरोपी गजाआड ६ फरार, १५.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३१०० किलो वजनाचे गोमांस जप्त केले असून, त्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ३० हजार रुपये आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान अन्य सहा आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या विशेष आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते. याच दरम्यान, जमजम कॉलनीतील सरकार लॉन्सजवळील एका मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे कत्तल केली जात असल्याची आणि हे गोमांस विक्रीसाठी एका वाहनातून वाहून नेण्यात येणार असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिसांचे वाहन येताना पाहताच कत्तलखान्यावरील संशयितांची पळापळ सुरू झाली. यात काही जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, तरीही पोलिसांनी अत्यंत शिताफीने तीन आरोपींना जागीच ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अब्दुलनुर जब्बार कुरेशी (वय २०, रा. भारतनगर, संगमनेर), इमाम हुसैन शेख (वय २८, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) आणि अहमद फारुन शहा (वय ३२, रा. वडाळा, मुंबई) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ३१०० किलो वजनाचे गोमांस जप्त केले असून, त्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ३० हजार रुपये आहे. यासोबतच गोमांसाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे ६ लाख रुपये किमतीचे एक पिकअप वाहन, ५५ हजार रुपयांचे चार मोबाईल फोन, तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी सुरे, कुऱ्हाड आणि इतर धारदार साहित्य असा एकूण १५.८५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्ह्यामध्ये साद मुस्ताक कुरेशी, शोएब मोईनउद्दीन कुरेशी, अयाज हबीब कुरेशी, अरकान हबीब कुरेशी, शमशुद्दीन नसिर कुरेशी आणि सलमान नावाचा अन्य एक इसम (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) हे सहा जण फरार झाले आहेत. या सर्वांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील संबंधित कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 723
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाना कारवाई
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.