Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाट; लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

26/09/2026

SIR च्या नोटिसा आल्यात, घाबरू नका; दक्ष रहा!नोटीस मिळालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून कॅम्पला उपस्थित राहावे — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर

26/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; शिरूरमधून आणखी एका डॉक्टरला अटक, आठ डॉक्टरांसह आरोपींची संख्या २४ वर
गुन्हेगारी

अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; शिरूरमधून आणखी एका डॉक्टरला अटक, आठ डॉक्टरांसह आरोपींची संख्या २४ वर

अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या २४ वर पोहोचली असून, यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ८ डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच ३ मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारा एक मोठा पुरवठादार देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
श्रीरामपूर:
बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या आणि अवैध गर्भपात करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या गुन्ह्याची व्याप्ती आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरली आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या अत्यंत बारकाईने तपासादरम्यान काल या प्रकरणात आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली.
डॉ. ज्ञानेश्वर नायकोडी (वय ५४, रा. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तो बीएएमएस असून या रॅकेटमध्ये सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असून, आज आरोपीला राहता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कोठडीदरम्यान संबंधित डॉक्टरकडे गर्भवती महिलांना कोण पाठवत होते, यात कोणते एजंट सामील आहेत आणि आतापर्यंत किती महिलांच्या चाचण्या किंवा गर्भपात करण्यात आले, याचा सखोल तपास केला जाणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल तपास केला असता, विविध तालुक्यांमध्ये या एजंटचे मोठे जाळे सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर, मेडिकल चालक आणि एजंट यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या २४ वर पोहोचली असून, यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ८ डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच ३ मेडिकल चालक आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणारा एक मोठा पुरवठादार देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरण्यात येणारी एकूण ६ सोनोग्राफी मशीन्स वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आरोपींकडून जप्त केली आहेत. यासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ४ चारचाकी वाहने आणि १ दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या आंतरजिल्हा रॅकेटचा पुढील तपास अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अमोल भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 466
बेकायदा गर्भलिंग निदान सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ; गुन्हा दाखल

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाट; लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

By Annant Ppangarkar26/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटातील ‘मातोश्री वृद्धाश्रमा’त आज, शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास…

SIR च्या नोटिसा आल्यात, घाबरू नका; दक्ष रहा!नोटीस मिळालेल्या नागरिकांनी कागदपत्रांची पूर्तता करून कॅम्पला उपस्थित राहावे — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर

26/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरसकट कर्जमाफीची आग्रही मागणी

26/09/2026

संगमनेरचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

26/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.