Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी; महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने लागलेला ऐतिहासिक निकाल!
न्यायालय

३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी; महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने लागलेला ऐतिहासिक निकाल!

ही केस 'रेअरेस्ट ऑफ रेअर' (दुर्मिळातील दुर्मिळ) असल्याचे नमूद करत न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे :
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक आणि सर्वात मोठा निकाल दिला आहे. ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे.
गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत संपूर्ण सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.
महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती, ज्यानंतर अख्ख्या राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले आणि केवळ १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली.
सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते.
आज शिक्षेच्या तीव्रतेवर झालेल्या अंतिम सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. न्यायाधीशांनी मागील सुनावणीत आरोपीला स्वतःला काय शिक्षा द्यायला हवी असे विचारले असता त्याने आधी मौन बाळगले आणि नंतर न्यायालयात खोटी कहाणी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याला कडक शब्दांत फटकारले.
शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, आरोपीने चिमुरडीला जिवंत राहण्याचा कुठलाच पर्याय सोडला नव्हता आणि तिच्या मृत्यूनंतरही अत्याचार सुरूच ठेवला होता. वैद्यकीय शवविच्छेदनातून हे क्रूर कृत्य सिद्ध झाले असून ६५ वर्षे वय असले तरी आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही. ही केस ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ (दुर्मिळातील दुर्मिळ) असल्याचे नमूद करत न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली, ज्यामुळे पीडित कुटुंबाला अखेर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 710
फाशी भीमराव कांबळे विशेष न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.