Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील फसवणूक प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब कुटे यांना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर; प्रकृती आणि ७५ लाखांची ठेव लक्षात घेऊन कोर्टाचा निर्णय
न्यायालय

संगमनेरमधील फसवणूक प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब कुटे यांना औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर; प्रकृती आणि ७५ लाखांची ठेव लक्षात घेऊन कोर्टाचा निर्णय

कुटे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि 'एनआयव्ही' सपोर्टवर उपचार घेत आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/06/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
छत्रपती संभाजीनगर:
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक आणि ‘एमपीआयडी’ गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रामुख्याने आरोपीची गंभीर वैद्यकीय प्रकृती आणि न्यायालयीन अटींचे केलेले पालन या दोन महत्त्वाच्या बाबींवर आपले निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, नाशिकच्या सिव्हिल सर्जन यांनी सादर केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपी भाऊसाहेब कुटे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि ‘एनआयव्ही’ सपोर्टवर उपचार घेत आहेत. त्यांना सध्याच्या स्थितीत सातत्याने वैद्यकीय देखरेखीची आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे अहवालावरून प्रथमदर्शनी दिसून येते.
याशिवाय, न्यायालयाने पूर्वी दिलेल्या आदेशानुसार आरोपीने विशेष न्यायालयात ७५ लाख रुपयांची रक्कम जमा करून अटींचे पूर्ण पालन केले आहे, ही बाबही न्यायालयाने निर्णय देताना विचारात घेतली. आरोपीची चिंताजनक प्रकृती आणि एकूण परिस्थिती पाहता, गुन्ह्याच्या गुणवत्तेवर कोणतेही अंतिम मत व्यक्त न करता, न्यायालयाने त्यांना आधी मिळालेला अंतरिम जामीन कायम करत नियमित जामीन मंजूर केला. या प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. मुकुल एस. कुलकर्णी यांनी तर शासनातर्फे ॲड. डी. जे. पाटील यांनी बाजू मांडली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,481
औरंगाबाद खंडपीठ दूधगंगा पतसंस्था नियमित जामीन फसवणूक भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.